Jawan Leaked: किंग खानचा ‘जवान’ प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाइन झाला लीक; कमाईवर होणार परिणाम?

Jawan Leaked: किंग खानचा ‘जवान’ प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाइन झाला लीक; कमाईवर होणार परिणाम?

Jawan Leaked Online In HD Quality: किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानचा (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित सिनेमा ‘जवान’ आज ७ सप्टेंबर दिवशी प्रदर्शित झाला. चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत होते. (Jawan Hindi Cinema) प्रदर्शनाच्या अगोदरच अॅडव्हान्स बुकिंगमधून या सिनेमाने लाखोंची कमाई केली आहे. (Jawan Leaked) सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)


मिळालेल्या माहितीनुसार, ‘जवान’ सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या काही तासांमध्येच पायरसीचा बळी ठरला आहे. हा सिनेमा तमिळरॉकर्स, एमपीफोर मुव्हिज, वेगामुव्हिज आणि फिल्मीझिला सह अनेक साइटवर फुल एचडी प्रिंटमध्ये लीक करण्यात आला आहे. हा सिनेमा ऑनलाइन बघण्यासोबतच डाऊनलोड देखील करता येणं शक्य आहे. यामुळे सिनेमाच्या कमाईवर याचा चांगलाच परिणाम होणार असल्याने निर्मात्यांची चिंता आता वाढली आहे.

किंग खानचा सिनेमा ऑनलाइन लीक होण्याची ही पहिली वेळ नाही. याअगोदर देखील पठाणही प्रदर्शितच्या काही तासांनंतर पायरसीचा शिकार झाला होता. परंतु सिनेमाच्या ऑनलाइन लीकचा त्याच्या गल्लावर मात्र कोणताही परिणाम झाला नाही. किंग खान-दीपिका दापुकोण स्टारर सिनेमा पठाणने चांगलाच रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले.

‘जवान’ने प्रदर्शनाच्या अगोदर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सिनेमाने प्रीसेलमध्ये १७ कोटींपेक्षा जास्त गल्ला कमावला आहे. सध्या सोशल मीडियावर किंग खान आणि नयनताराचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी ‘पठान’लाही मागे टाकणार का ? अशी जोरदार चर्चा होत आहे. तसेच आता सिनेमा लीक झाल्याने त्याचा फटका देखील कमाईवर बसणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Jawan’ची नागपूर पोलिसांना भुरळ! किंग खानचा लूक शेअर करत म्हणाले, ‘जब आप ऐसे पासवर्ड…’

सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत किंग खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ आज अर्थात ७ सप्टेंबर आज थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खान यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube