Download App

Maratha Reservation : धक्कादायक! पहिली पास कर्मचाऱ्यावर मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी…

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation ) राज्यात रान पेटलेले असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाचं मागासलेपण शोधण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे (Maratha Survey) काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वक्षणासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी हे अशिक्षित, अप्रशिक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात तर एक पहिली पास व्यक्ती या सर्वेक्षण करत असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे नगरमध्ये मराठा सर्वेक्षणाचा फज्जा उडाला असल्याचे समोर आले आहे.

जायचं होतं गोव्याला पण नवऱ्यानं घडवली ‘अयोध्या’; ‘हनीमून’ फेल झाल्याने पत्नीने मागितला घटस्फोट

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासनेबाबतचे सर्वेक्षण सध्या सुरु आहे. ३१ जानेवारी २०२४ पर्यंत हे सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी काम महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या भागात सर्वेक्षणाचं काम सुरू केलं आहे.मात्र हे सगळं सुरु असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या सर्वेक्षणासाठी चक्क पहिली पास चतुर्थ श्रेणीत काम करणारे कर्मचारी देखील कार्यरत आहे. नगर शहरात मनपाचा एक शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक यांचीही प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ उडाला आहे.

शिंदेंचा हस्तक लोणावळ्यात दाखल; जरांगेंचं वादळ मुंबईच्या वेशीवरच थांबणार?

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय?

अहमदनगर महानगरपालिकेकडून सर्वेक्षणासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली आहे. असाच एका कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा कर्मचारी म्हणतो की मी सर्वेक्षणासाठी आलो आहे. माझं ट्रेनिंग झालं आहे मात्र माझं शिक्षण झालं नसल्याने मला यामधील काही माहिती नाही. या कामासाठी मी एक जोडीदार सोबत घेतला आहे त्याच्या मदतीने मी हे सर्वक्षणाचे काम करतो आहे असं हा कर्मचारी सांगतो आहे. मी पालिकेत इलेक्ट्रिक मदतनीस म्हणून कार्यरत आहे. मात्र माझी शिक्षण पात्रता नसल्याने मला या कामाचा काही अनुभव नाही असे कर्मचारी काबुल करतो.

अधिकाऱ्यांना कल्पना मात्र तरीही गप्प

व्हायरल व्हिडिओमधील मनपाचा कर्मचारी म्हणाला, मला स्मार्टफोन वापरता येत नाही याबाबत मी अधिकाऱ्यांना देखील कल्पना दिली आहे. मात्र ते म्हणाले की तुम्ही तुमचं पाहा…तुम्ही कोणालाही सोबत घ्या व काम पूर्ण करा असे यावेळी कर्मचारी म्हणाला. मी पहिली पास असल्याचे यावेळी व्हिडीओ मध्ये कर्मचारी म्हणत आहे. यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर पालिकेने सर्वेक्षणाची जबाबदारी दिल्याने नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त केला जातो आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आता यावर मनपाचे अधिकारी काय उत्तर देणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us