Ahilyanagar woman kidnapped : बदनामी करण्याची धमकी देवून महिलेला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार अहिल्यानगर तालुक्यातील देहरे गावात घडलाय. या प्रकरणी तिघांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तन्वीर शेख, सोहेल शेख, अल्फेज शेख असे आरोपींचे नावे आहेत. अल्फेज जमशेद शेख याला पोलिसांनी अटक केलीय. महिलेवर तन्वीर शेख याने अत्याचार केला. तो आणि सोहेल शेख हे फरार असून, या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.
आरोपी व महिला एकाच गावातील रहिवासी आहेत. 29 वर्षीय महिलेची तन्वीर शेख याच्याशी इन्टाग्रामवर ओळख झाली आहे. एकाच गावातील असल्याने दोघे एकमेंकाशी बोलत होते. त्यातून आपली ओळख असल्याचे तुझ्या घरच्यांना दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच मुलाला मारून टाकण्याची धमकी देवून तन्वीर शेख याने इतर दोघांच्या मदतीने एका कारमधून महिलेला पळवून नेले. गावाजवळीच शिंगवे येथील एका हॉटेलवर तन्वीर शेख याने दोन दिवस महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच महिलेकडील दहा हजार रुपये व सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. या महिलेला 14 मार्च रोजी पळवून नेले होते. रविवारी ही महिला सापडली, त्यानंतर तिने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
बस स्थानक, एसटी बस आणि प्रीपेड ऑटो रिक्षेबाबत मंत्री सरनाईकांकडून महत्त्वाचे निर्देश
अकोले बसस्थानकात सापडली महिला
महिला बेपत्ता असल्याने पोलिस तिचा शोध घेतला. ही महिला अकोले बसस्थानकावर पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी या महिलेकडे विचारपूस केल्यानंतर तिने तन्वीर शेख याने बदनामी करण्याची धमकी देवून, मुलाला जीवे मारण्याची धमकी देवून अत्याचार केल्याचे फिर्याद दिली आहे.
‘मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध, आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं अन् …’, बीडमधल्या ट्रक ड्रायव्हरच्या हत्येची इनसाईड स्टोरी
गाव बंद आंदोलन
या घटनेनंतर ग्रामस्थांनी गावबंद आंदोलन करून घटनेचा निषेध केला. दोन दिवस गावात मोठा पोलिस बंदोबस्त होता. तसेच आमदार संग्राम जगताप यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. तसेच गावातील बेकायदेशीर राहणाऱ्या व्यक्तींचा प्रशासनने शोध घ्यावा, अतिक्रमणे हटवावेत, अशी मागणी प्रशासनाकडून करण्यात आलीय.