‘मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध, आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं अन् …’, बीडमधल्या ट्रक ड्रायव्हरच्या हत्येची इनसाईड स्टोरी

Truck Driver Killed Over Love Affair with Owner’s Daughter Beed : मागील काही दिवपासून गुन्हेगारीचं केंद्रबिंदू ठरलेला बीड (Beed) जिल्हा पुन्हा चर्चेत आलाय. आष्टी तालुक्यात एका ट्रक ड्रायव्हरची अमानुषपणे हत्या केल्याची घटना घडली. परंतु या भयंकर घटनेमागील कारण देखील धक्कादायक आहे. विकास बनसोडे (Vikas Bansode) असं हत्या झालेल्या तरूणाचा नावं आहे. तो ज्या व्यक्तीकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्यानेच विकासला संपवल्याचं उघडकीस आलंय. आपण या हत्याकांडाची इनसाईड स्टोरी काय (Beed Crime) आहे, ते पाहू या.
आष्टी तालुक्यामध्ये विकास बनसोडे नावाच्या तरूणाची हत्या झाली आहे. विकास मूळचा जालन्यातील रहिवासी आहे. तो आष्टी तालुक्यामधील पिंपरी घुमरीच्या भाऊसाहेब क्षीरसागर नावाच्या व्यक्तीकडे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. मागील तीन ते चार वर्षापासून विकास क्षीरसागरकडे कामाला असल्याचं सांगितलं जातंय.
बीडमध्ये सुसज्ज विमानतळ उभारणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात अधिकृत घोषणा
विकासचे आपल्या अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध सुरू आहेत, असा संशय भाऊसाहेब क्षीरसागरला काही दिवसांपूर्वी आला होता. याच कारणातून क्षीरसागरने मागील काही दिवसांपूर्वी विकासला कामावरून सुद्धा काढून टाकलं होतं. काम गेलं, तरीही विकासचे मालकाच्या पोरीसोबत प्रेमसंबंध कायम असल्याची माहिती मिळतेय.
मागच्या आठवड्यामध्ये विकास पुन्हा कड परिसरात आला आणि क्षीरसागरच्या मुलीला भेटला. ते दोघेजण घरामागील शेतात एकमेकांना भेटले. परंतु त्या दोघांना क्षीरसागर यांनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. दोघांना त्या अवस्थेत पाहून क्षीरसागरला संताप अनावर झाला. त्याने काही नातेवाईकांच्या मदतीने विकासला पकडलं. त्याला दोन दिवस शेतामध्ये डांबून ठेवलं अन् बेदम मारहाण केली.
रंगभूमीवर अवतरणार 55 वर्षांपूर्वींचं बालनाट्य; अंजू उडाली भुर्रच्या तालमीचा मुहूर्त संपन्न
लाठ्या काठ्या आणि दोरी वायरच्या साहाय्याने त्यांनी विकासला अमानुष मारहाण केली. या मारहाणीतच विकासचा जीव गेला होता. बेदम मारहाणीमुळे विकासचं संपूर्ण शरीरच काळं निळं सुद्धा पडलं होतं. विकासच्या मृत्यूनंतर ही घटना त्याच्या पालकांना समजली. विकासच्या भावाने क्षीरसागरनेच आपल्या भावाला मारलं, असा आरोप केलाय.