Download App

दूध दरवाढीसाठी उपोषण! शरद पवारांचा पत्र धाडत उपोषणकर्त्यांना दिलासा; म्हणाले..,

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामध्ये दुधाला 34 रुपये भाव मिळावा, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून अकोले तहसील कार्यालयासमोर दूध उत्पादक शेतकरी आमरण उपोषणास बसले आहेत. सरकारने पाच दिवस उलटूनही उपोषणकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आता उपोषणकर्त्यांकडून केला जात आहे. अशातच आता या प्रश्नावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी, अशी मागणी पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Animal Event: ‘मुंबईचे दिवस गेले, हैदराबादला या! तेलंगणाच्या नेत्याची रणबीर कपूरला ऑफर

शरद पवार निवेदनात म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांची बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर निश्चित करूनही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे दिसते. या संदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. व त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे.

Sanjay Raut : ‘तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर’.. राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांना देखील विनंती की, त्यांनी दूधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी” असं पवार म्हणाले आहेत.

थायलंड, श्रीलंकेनंतर आता मलेशियाने भारतीयांना दिली व्हिसा फ्री एंट्री, जाणून घ्या कारण?

मंत्री विखे यांच्या उपस्थितीत दूधदरवाढी बाबत एक बैठक पार पडली होती. या झालेल्या बैठकीत दुधाला 34 रुपये भाव दूध कंपन्या आणि दूध संघांनी द्यावा, असा आदेश देखील काढण्यात आला होता. मात्र शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 26-27 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे सरकारने दूध कंपन्या आणि संघांना 34 रुपये दर देण्यासाठी ठोस पाऊले उचलावी अशी मागणी उपोषणकर्त्यानी केली आहे.

दरम्यान, उपोषणकर्त्यांनी प्रकृतीची काळजी घेऊन उपोषण मागे घ्यावं, शासनाबरोबर चर्चा करुन चर्चेतून मार्ग काढू, असं आश्वासन शरद पवार यांनी उपोषणकर्ते अजित नवले यांच्यासह उपोषणकर्त्यांना दिलं आहे.

Tags

follow us