नाशिक : आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. राजकारणामध्ये सत्य सांगणं हे उपयोगाचं नसत, लोकांना जो जास्त मूर्ख बनवू शकतो तोच जास्त यशस्वी होऊ शकतो असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. गडकरी यांचे हे वक्तव्य ऐकून कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला होता. दरम्यान गडकरी यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता? यावरून सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
शेतकरी नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना मोबाईलद्वारे देणार, जाणून घ्या संपर्क क्रमांक
नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर मोहाडी येथील आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाषण केलं. यावेळी गडकरी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
भाजपाला आमची गरज नसल्यास आम्ही स्वतंत्र लढू, महादेव जानकर स्पष्टच बोलले
मोहाडी परिसरातील सह्याद्री फार्म कंपनीच्या परिसरात बायोगॅस ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी राजकारणात सत्य सांगणे काही कामाचं नसतं, असं म्हटलं. तसेच लोकांना जो जास्त मूर्ख बनवू शकतो तोच जास्त यशस्वी होऊ शकतो असे गडकरी म्हणाले.