शेतकरी नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना मोबाईलद्वारे देणार, जाणून घ्या संपर्क क्रमांक

शेतकरी नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना मोबाईलद्वारे देणार, जाणून घ्या संपर्क क्रमांक

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतला आहे. राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. मात्र आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) सरसावले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या नुकसानीची माहिती आता थेट कृषिमंत्र्यांना पाठवू तसेच सांगू शकणार आहे. यासाठी कृषिमंत्र्यांनी काही संपर्क क्रमांक जाहीर केले आहे. यामुळे आता बळीराजा हा थेट कृषिमंत्र्यांच्या संपर्कात असणार आहे.

गेल्या काही डासांपासून राज्यातील हवामान बदलले आहे. उन्हळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. या अवकाळीने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला आहे. अवकाळी पावसामुळे शेतात उभी पिके आडवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

नैसर्गिक संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला पिकांचे पंचनामे करण्यास मोठा कालावधी लागतो. परिणामी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई (Nuksan Bharpai) मिळण्यास देखील विलंब होत असतो. एकंदरीत हे सगळं लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे हे कृषिविभागाच्या व कृषिमंत्र्यांच्या लक्षात आले.

मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या खाजगी बसला अपघात, तीसहून अधिकजण…

नुकसानीची माहिती ताबडतोब सरकारला मिळावी यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवावी असं आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. नुकसानीची माहिती देण्यासाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल क्रमांकही जाहीर केले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…महाराष्ट्र ‘SET 2023’ परीक्षेचे प्रवेश पत्र जारी

शेतकरी थेट कृषिमंत्र्यांच्या संपर्कात
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल नंबर जारी केला आहे.
संपर्क क्रमांक: 9422204367 | 022-22876342 | 022-22875930 | 022-22020433

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी कृषीमंत्र्यांनी थेट आपला मोबाईल नंबर जाहीर केला आहे. यामुळे आता शेतकरी नुकसानीची माहिती या नंबरवर कॉल करून थेट कृषिमंत्र्यांकडे देऊ शकतात. त्यामुळे आता शेतकर्‍यांना आपल्या पिकाच्या नुकसानीची माहिती थेट कृषिमंत्र्यांना कळवता येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube