Download App

गुलाबराव पाटलांना ‘जुलाबराव’ म्हणताच चिडले; मराठा आंदोलकाला केली शिवीगाळ?

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची मराठा आरक्षणाच्या विषयावरून एका व्यक्तीसोबत सोबत बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी फोन करुन भूमिका मांडण्याची केली. त्यावरून वादावादी होताच मराठा आंदोलकाने गुलाबरावांचा उल्लेख गुलाबराव ऐवजी ‘जुलाबराव’ असा केला. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील चांगलेच चिडले असून त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकाने केला आहे.

Maratha Reservation : आत्ता या, ढंपर भरुन पुरावे देतो; तातडीने अध्यादेश काढा : मनोज जरांगेंचा प्रस्ताव

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना शिंदे गटाची मुलूख मैदानी तोफ मानले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अद्याप एकही अवाक्षर काढलं नाही, त्यावरच बोट ठेवत एका संतप्त आंदोलकाने थेट गुलाबराव पाटलांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत सांगितलं, त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करणार होते, त्यामुळे आम्ही मराठा आरक्षणावर भाष्य केलं नाही, वरिष्ठ नेत्याने सांगितल्यानंतर आम्हाला वरिष्ठ नेत्याचं ऐकावं लागतं, माझ्याजागी तुम्ही बसून पहा मग समजेल, या शब्दांत गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मारीच्या पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी; ITC कंपनीला ग्राहक न्यायालयाचा मोठा दणका

तसेच पुढे बोलताना आंदोलकाने तुम्ही मराठा समाजासाठी राजीनामा द्या, कोणताही पक्ष सोबत नसला तरीही तुम्हाला मराठा समाज निवडून देणार असल्याची ग्वाहीच दिली, त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, तुम्ही राजीनामा देण्याचं म्हणताय, तर चालेल पण तुम्ही राजीनाम्याबाबत मला सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगा, असं केल्यानंतर सरकार कोसळेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरचा मराठा समाजाचा रागही निघून जाणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी खडसावून सांगितलं आहे.

‘इंडिया’ VS ‘भारत’ वादात वीरेंद्र सेहवागची उडी, थेट बीसीसीआयला सुनावले

दरम्यान, तुम्ही सध्या तुमच्या ज्या जागेवर आहात त्याजागी राजीनाम्याबाबत बोलणं योग्यच आहे, पण तुम्ही आमच्या जागेवर बसून पहा मग समजेल, असंही गुलाबराव पाटलांनी आंदोलनकर्त्यांला सांगितलं आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत असून या ऑडिओ क्लिपची पुष्टी लेट्सअप मराठी करीत नाही.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कार्यकर्त्याला अश्लील शिवीगाळ केली. तसेच त्याला आईवरूनही शिवीगाळ केली. गुलाबरावांनी शिवीगाळ केल्यावर कार्यकर्त्याकडूनही गुलाबराव पाटलांना अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याचे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये दिसते. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या तिघांविरोधात धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

follow us