Download App

‘…तर मी राजकारणातून संन्यास घेईन’; विखे पाटलांचे थोरातांना ओपन चॅलेंज

तलाठी भरती प्रक्रियेत भष्ट्राचार झाल्याचं थोरातांनी सिद्ध केलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल, नाहीतर थोरांतांनी बाहेर पडावं - मंत्री विखे

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोप होत असतात. आताही मंत्री विखे पाटील यांनी थोरातांना ओपन चॅलेंच दिलं. तलाठी भरती प्रक्रियेत भष्ट्राचार झाल्याचं थोरातांनी सिद्ध केलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल, नाहीतर थोरांतांनी बाहेर पडावं, असं ओपन चॅलेज विखेंनी दिलं.

पुणे शहरातील एकही रस्त्यात खड्डा राहू नये; मंत्री मोहोळ यांनी मनपा अधिकाऱ्यांना भरला दम ! 

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी तलाठी भरतीवरून सातत्याने सरकारवर टीका केली होती. विशेष म्हणजे रोहित पवारांनी तलाठी भरतीचा मुद्दा लावून धरला होता. मात्र, शासनाने परीक्षांचा निकाल अंतिम ठरवत मेरीट लिस्टमधील उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी बोलतांना राधाकृष्ण विखेंनी थोरात-पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्यावर नाचताना पाहिले तेव्हा मला दु:ख…; फडणवीसांची बोचरी टीका 

विखे म्हणाले, तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला असा आरोप आपल्याच जिल्ह्यातील दोन महाभागांनी त्यावेळी माझ्यावर केले होते. माजी महसुलमंत्री आणि विद्यमान आमदारांनी हे आरोप केले होते. आम्ही विभागाच्या वतीने त्या आरोपांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्णय घेतला होता. मात्र, मला या गोष्टीचं समाधान आहे की, या संपूर्ण आरोपाला उत्तर म्हणून सगळ्या जिल्ह्यातील तलाठी बांधवाना नियुक्ती पत्र देऊन त्यांना मोठी चपराक विभागाने दिली. व्यवस्था बदनाम करण्याचा प्रयत्न झाला मात्र विभागाने चांगलं काम केलंय. अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली.

थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत तर…
पुढं बोलतांना ते म्हणाले, माझ्यावर जे भ्रष्टाचार केले आहेत, त्यावर माजी महसूलमंत्र्यांना माझे आव्हान आहे की एकदा तुम्ही साईबाबाच्या मंदिरात या. मी पण तिथे येतो आणि साईबाबांची शपथ घेऊन सांगा की, यात भ्रष्टाचार झाला आहे. या तलाठी भरतीतील भ्रष्टाचार झाल्याचे थोरातांनी सिद्ध करून दाखवावं, त्यांनी भ्रष्टाचार झाल्याच सिध्द केलं तर मी राकारणातून बाजूला जाईल आणि थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी बाहेर जावं, असं चॅलेंज विखेंनी दिलं.

 

follow us