पुणे शहरातील एकही रस्त्यात खड्डा राहू नये; मंत्री मोहोळ यांनी मनपा अधिकाऱ्यांना भरला दम !

  • Written By: Published:
पुणे शहरातील एकही रस्त्यात खड्डा राहू नये; मंत्री मोहोळ यांनी मनपा अधिकाऱ्यांना भरला दम !

Murlidhar Mohol Held meeting Pune Municipal Corporation and Police Department: जोरदार पावसामुळे पुण्यातील रस्त्यांची दुरवस्था झालीय. या रस्त्यांची दुरुस्ती होण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. येत्या काही दिवसांत शहरात एकही रस्त्यात खड्डा राहाता कामा नये, असा दमही मोहोळ यांनी महापालिका प्रशासनला भरलाय. तर खड्डे बुजाविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा इशाराही मोहोळ यांनी दिलाय. त्यावर पुढील 4-5 दिवसांस खड्डे बुजविण्याची कार्यवाही करु, असे आश्वासन पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाने दिलेय.

>पुणे शहरात (PUNE) गेली काही दिवस पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला आहे. शिवाय शहरात ठिकठिकाणी खड्डेही मोठ्या प्रमाणात झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय हवाई वाहतूक व सहकार मंत्री मोहोळ यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची एकत्रिक बैठक घेतली. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने उपस्थित होते.

Supriya Sule : पुणे शहरातील बांधकामं तात्काळ थांबवा; ‘या’ कारणामुळे सुळेंची मागणी

पुणे महापालिका हद्दीत पंधरा वार्ड ऑफिस असून या प्रत्येक वॉर्ड ऑफिसला प्रत्येकी दोन अशा तीस टीम तयार करुन खड्डे बुजविणे आणि वाहतूक नियोजन करा, असे निर्देश मोहोळ यांनी दिलेत. महापालिका आणि पोलीस यांनी एकत्र काम करावे, असा सल्लाही मोहोळ यांनी दिलाय. मोहोळ म्हणाले, ‘ पुणे शहरात 1 हजार 400 किलोमीटरचे रस्ते असून खड्डे बुजवण्यात महापालिका कमी पडत आहे. प्रशासनाने यावर काम केलंs पाहिजे. शिवाय वार्ड ऑफिसर रस्त्यावर असणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित झाले पाहिजेत. या दोन्ही विषयांसंदर्भात पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेणार असून लोकप्रतिनिधी म्हणून आमचे लक्ष आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचा BAMS विद्यार्थ्यांना दिलासा, पदव्युत्तर अभ्यासक्रमाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय…

वाहतूक नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे सर्व वॉर्डन रस्त्यावर उतरावेत. शिवाय होम गार्डचे मनुष्यबळही पुरेपुर वापरून वाहतूक सुरुळीत करावी. शिवाय होम गार्डची उपलब्धता पुणे पोलिसांनी करुन द्यावी, अशीही सूचना मोहोळ यांनी बैठकीत केल्या.

‘ठेकेदारांनी रस्त्यांची जबाबदारी घ्यायला हवी. पण जो कोणी घेत नसेल, त्यांच्यावर कारवाई करायला हवी. शिवाय कामात हयगय करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घालू नका, अशा सूचना मोहोळ यांनी दिल्यात.

मुंबईपेक्षा पुणे चांगलं आहे; मोहोळ यांचा ठाकरेंना टोला

उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेची धुरा वर्षानुवर्षे सांभाळली आहे. त्यांनी आधी मुंबईतील रस्त्यांची परिस्थिती पाहावी. मुंबईपेक्षा पुणे खूप चांगलं आहे, असा टोला मोहोळ यांनी ठाकरे यांना लगावला. पुरानंतर आम्ही सगळे फिल्डवर फिरलो होतो. शिवाय पाणी घरात घुसले तेव्हा आमची सर्व मंडळी मदतीस होती. भारतीय जनता पार्टीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुराच्या पाण्यात होते. शिवाय औषध फवारणी, पाणी, स्वच्छता आणि विद्युत मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता बऱ्यापैकी लोकांचे जनजीवन सुरळीत झाले आहे, हेही मोहोळ यांनी सांगितले.


राजाराम पुलाजवळी उड्डाणपूल लवकरच सेवेत

राजाराम उड्डाणपुलाजवळ सिंहगड रस्त्यावर साकारलेल्या उड्डाणपुलावर डांबरीचे आवरण व्हायचे राहिले असून पावसाने उघडीप घेतल्यास हे आवरण पूर्ण होईल. डांबरीचे आवरण न करता जर पूल वाहतुकीस सुरु केला तर मोठी अडचण होणार आहे. म्हणूनच ब्रीजच्या कामात राजकारण आणू नये, कारण पूल सुरु करण्यास प्रशासनाचा ग्रीन सिग्नल बाकी अद्यापही बाकी असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

https://youtu.be/eW9tO2G8bm8?si=jfYSOEuhaME3Rwjj

follow us
  • fb
  • instagram
  • youtube