पुणे महापालिका आयुक्तांचा कर्मचाऱ्यांना दणका; तब्बल 2300 जणांवर कारवाईचे आदेश

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 04T184055.505

Pune Corporation :  पुणे महापालिकेतील 2 हजार 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याला कारणही तसेच घडले आहे. एक मे रोजी महाराष्ट्र दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या दिवशी शाळा व शासकीय कार्यालयामध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम होत असतो. त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहणे अनिवार्य असते. पण पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या दिवशी सुट्टी आहे असे समजून या कार्यक्रमाला दांडी मारली आहे.

तब्बल बारा वर्षांनंतर पाकिस्ताचे पराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर

यानंतर पुणे महानगरपालिकेचे आयुक्त अत्यंत संतापले असून त्यांनी पुणे महापालिकेच्या 2 हजार 300 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एक मे रोजी पुणे महापालिकेत जो महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम झाला त्याला फक्त 200 कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

अंबादास दानवे म्हणाले, शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादीत एकजूट…

या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी या अगोदर ज्या अधिकाऱ्यांना व सेवकांना ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहणे शक्य होणार नाही, त्यांना आपल्या नजीकच्या शासकीय किंवा सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहून लेखी प्रमाणपत्र खाते प्रमुखांकडे सादर करावे असे आदेशात म्हटले होते. तरीही फक्त 200 कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत

Tags

follow us