तब्बल बारा वर्षांनंतर पाकिस्ताचे पराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर

तब्बल बारा वर्षांनंतर पाकिस्ताचे पराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर

Bilawal Bhutto In India : शेजारी शेजारी मात्र एकमेकांचे शत्रू असलेले भारत – पाकिस्तान यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी हे आज 4 मे रोजी भारत दौऱ्यावर येणार आहे. विशेष म्हणजे तब्बल 12 वर्षानंतर हा प्रसंग घडतो आहे. गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.

कोण आहेत बिलावल ?
बिलावल भुट्टो झरदारी हे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून बिलावल यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा भारत दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. तब्बल 12 वर्षांनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात येत आहेत. मात्र हे मंत्री आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहे. त्यांनी आजवर अनेकदा भारताविरोधात कडव्या शब्दात टीका केली आहे.

पाकिस्तानचे मंत्री तब्बल 12 वर्षानंतर भारतात
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचा आजचा भारत दौरा हा दोन्ही देशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री हे तब्बल 12 वर्षांनंतर भारतात येत आहेत. भुट्टोच्या आधी हिना रब्बानी खार 2011 मध्ये भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री एसएम कृष्णा यांची भेट घेतली होती.

तसेच 2002 मध्ये बिलावल यांच्या आई आणि पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनजीर भुट्टो या देखील भारतात आलेल्या आहेत. त्यावेळी बेनजीर भुट्टो यांनी भारताचे तात्कालिन प्रधानमंत्री अटल बिहारी बाजपेयी यांची भेट घेतली होती. तर 2012 मध्ये बिलावल यांचे वडिल आसिफ अली जरदारी हे भारतात आले होते.

निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ

भारतविरोधी वादग्रस्त विधानं…
बिलावल भुट्टो जम्मू-काश्मीरबाबत नेहमीच वादग्रस्त विधाने करत असतात. 2014 मध्ये, काश्मीर मुद्द्यावर बोलताना त्यांनी आपल्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (PPP) च्या कार्यकर्त्यांना सांगितले – मी संपूर्ण काश्मीर परत घेईन. मी भारतासाठी एक इंचही सोडणार नाही, कारण काश्मीर फक्त पाकिस्तानचे आहे. पाकिस्तानातील इतर राज्यांप्रमाणे काश्मीरही आपले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube