निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ

निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ

Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पवार यांनी राजकीय निवृत्ती घेऊन राजकारणात एकच खळबळ उडवून दिली. मात्र त्यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न केले जात आहे. यावर आज शरद पवार म्हणाले. जर मी तुमच्या सर्वांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला हा निर्णय घेऊ दिला नसता. मात्र येत्या एक ते दोन दिवसात मी अंतिम निर्णय घेईल जेणेकरून कार्यकर्त्यांना असे आंदोलन करावे लागणार नाही. असे सूचक वक्तव्य पवार यांनी केले आहे.

दरम्यान शरद पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यापासून राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. यातच राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेत्यांनी देखील शरद पवार यांची मनधरणी सुरु केली आहे. यातच कार्यकर्त्यांनी थेट आंदोलनाला बसले आहे. पवार यांनी निर्णय मागे घ्यावा असे आवाहन कार्यकर्त्यांनी पवारांना केले आहे.

यातच यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत, त्यांना समजावताना शरद पवारांनी आपली भूमिका मांडली. पवार म्हणाले, जर मी तुमच्या सर्वांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला आ हा निर्णय घेऊ दिला नसता. मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतो. मी हा निर्णय घेतल्यानंतर मला देशभरातून फोन येऊ लागले होते. मात्र मी घेतलेला निर्णय हा पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे.मात्र कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता मी येत्या एक ते दोन दिवसात मी माझा अंतिम निर्णय जाहीर करेल, असे खुद्द शरद पवार यांनी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube