Download App

‘…तरच दूध भेसळ रोखता येईल’; राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला तोडगा

Radhakrushna Vikhe Patil : राज्यात दुध भेसळीच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अशातच आता दुध भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्याचं पाहायला मिळतंय. दुध भेसळ रोखण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी(Radhakrushna Vikhe Patil) तोडगा सांगितला आहे. दुध भेसळ चौकशीचं काम सध्या अन् व औषध प्रशासनाकडे असून ते दुग्धविकास विभागाकडे दिल्यास दुध भेसळ रोखता येणार असल्याचं विखे पाटलांनी स्पष्ट केलं आहे.

विखे पाटील म्हणाले, राज्यातील दूध भेसळ प्रथमता रोखली पाहिजे, सद्यस्थितीला 30 टक्के दूध भेसळीचे प्रमाण आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे सध्या मनुष्यबळाची कमतरता असून दूध आणि दूधजन्य पदार्थांमध्ये चौकशीचे काम दुग्धविकास विभागाकडे देण्यात यावे, अशी विनंती सरकारकडे केलेली असल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूध भेसळ, दुधाची गुण परत 8.5 3.5 आहे. मात्र आम्ही याबाबत आता नवीन आदेश काढले असून भेसळीचं प्रमाण 2 आणि 3.2 चं असेल असे नवे आदेश आम्ही काढले आहेत. त्यामुळे दूध भेसळीला रोखण्यात यश मिळणार असल्याचा विश्वासही विखेंनी व्यक्त केला आहे.

Manoj Jarange तुम्ही अजून लहान, जरा अभ्यास करा; राणेंचा अक्कल काढत खोचक सल्ला

दुध दरवाढीचे आदेश दिलेत…

राज्यातील काही भागांत दुध दरवाढीसाठी उपोषण आंदोलन करण्यात येत आहेत. दुधाला 34 रुपये दर मिळावा या मागणीसाठी अहमदनगरमधील अकोले तालुक्यात डॉ. उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण केलं आहे. त्यामुळे आम्ही दुधाच्या दराबात 34 रुपये भाव दिला पाहिजे, असे आदेश प्रशासनाला दिले असल्याचं विखेंनी सांगितलं आहे.

वॉलमार्टचा चीनला मोठा धक्का, आयातीसाठी भारताला दिले प्राधान्य

पंचनाम्याचे आदेश :
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून याबाबत नुकतीच मंत्रिमंडळात बैठक पार पडली. याबाबत आम्ही तातडीने पंचनामाचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी प्रयत्न असून संबंधित विभागांना आदेश दिले असल्याचे यावेळी विखे पाटील म्हणाले.

FRP नूसारच ऊसाला भाव :
एफआरपीप्रमाणे प्रत्येक कारखाना ऊसाचे भाव देत आहेत. यावर्षी बहुतांश कारखान्यांनी एफआरपी पेक्षा जास्त दर देण्याचे कारखान्यांनी पहिला हप्ता देण्याचे ठरवले आहे. तर दोन्ही पुढे जाऊन ते दर वाढवूनही देतील. मी पाच महिन्यांपूर्वीच या उसाच्या गाळा पाला तीन हजार रुपये दर जाहीर केला होता हे काय स्पर्धेतून केलं नसून शेतकऱ्यांच्या खिशात 2 रुपये जास्त जावे या उद्देशाने ते दर जाहीर केले होते. फॅक्टरी उत्पादन वाढले पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचंही विखे म्हणाले आहेत.

Tags

follow us