जाळपोळ करून, जीवघेणे हल्ले करून आरक्षण मिळते का ? राधाकृष्ण विखेंचा सवाल

  • Written By: Published:
जाळपोळ करून, जीवघेणे हल्ले करून आरक्षण मिळते का ? राधाकृष्ण विखेंचा सवाल

Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरंगे-पाटील याचं मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) अंतरवली सराटीत उपोषण सुरू असतांना आंदोलनाला हिसक वळण लागलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. बीडमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक करून त्यांची घर जाळण्यात आली होती. यावर आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी भाष्य केलं. बीडच्या घटनेत गुंडा एलिमेंट जास्त होता, असं विधान त्यांनी केलं.

गजाभाऊंच्या मतदारसंघातून सिद्धेश उभा राहणार : रामदास कदमांचे दुसऱ्या मुलासाठी लॉबिंग 

मराठा आंदोलनादरम्यान, बीड जिल्ह्यात जमावाने लोकप्रतिनिधींच्या घरांना आग लावण्याच्या घटना घडल्या. राज्यात प्रथमच अशा प्रकारचे लोकप्रतिनिधिंच्या घराला पेटवून दिल्याच्या घटना घडल्या. या घटनेचा सूत्रधार कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दरम्यान, आज अकोल्यात माध्यमांशी बोलत असतांना विखे पाटलांनी यावर भाष्य केलं. ते म्हणाले, बीडमधील जाळपोळीच्या घटनांची चौकशी शासनाने सुरू केली आहे. सामान्य नागरिक आणि आमदारांच्या मालमत्तेचं मोठ नकुसासन झालं. या घटनेत गुंडा एलिमेंट जास्त होता, असं ते म्हणाले.

जाळपोळ करून, जीवघेणे हल्ले करून असं आरक्षण मिळतं का? असा सवाल त्यांनी विखे पाटलांनी केला. जरांगे पाटलांनी शांततेच्या मार्गाने मागणी केली. त्याला आमचा देखील पाठिंबा आहे. आरक्षण मिळण्याबद्दल कोणाचा विरोध नाही. जरांगे पाटलांनी कुणीही कायदा हातात घेऊ नये, असं आवाहन केलं. तरीही जाळपोळीच्या घटना घडल्या. मला वाटतं, या घटनांमागे समाजकंटकांचा हात असावा, काय ते लवकरच समोर येईल, असं विखे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईने अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी भावना व्यक्त केली. त्याविषयी विचारलं असता विखे म्हणाले की, कुठल्याही आईला वाटेल त्यांच्या मुलाचं कर्तृत्व आहे, त्यांना संधी मिळावी. यामुळं आपल्या मुलाबद्दल भावना व्यक्त करणं यात काही गैर नाही.

शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी काम केल्यानं त्यांची खासदारकी रद्द करा, अशी मागणी केली होती. याविषयी विखेंना विचारलं असता त्यांनी सुप्रिया सुळेंना जोरदार टोला लगावला. ज्यांनी जनाधार गमावला, पक्ष गमावला अश्या लोकांच्या विधानाला फार महत्व देण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube