गजाभाऊंच्या मतदारसंघातून सिद्धेश उभा राहणार : रामदास कदमांचे दुसऱ्या मुलासाठी लॉबिंग

गजाभाऊंच्या मतदारसंघातून सिद्धेश उभा राहणार : रामदास कदमांचे दुसऱ्या मुलासाठी लॉबिंग

मुंबई : “गजाभाऊंच वय झालं आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात गजानन किर्तीकर उभे राहिले नाहीत तर त्या ठिकाणी सिद्धेश कदम उमेदवारी मागतील. तो आपला हक्क आहे आणि अधिकारी आहे, असे म्हणत माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलासाठी मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. (Ramdas Kadam claims North West Lok Sabha constituency in Mumbai for siddhesh Kadam)

रामदास कदम हे दापोली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना सिद्धेश कदम हे मुंबईतून लोकसभेची तयारी करत आहेत का? त्यांचे बॅनर्स सातत्याने दिसून येत आहेत, असा सवाल विचारला. त्यावर कदम यांनी सिद्धेश कदम यांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी भाजपनेही या मतदारसंघातून तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता उत्तर पश्चिम मतदारसंघातून नेमका शिंदे गट की भाजप कोणाचा उमेदवार असणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

आमदार अपात्रता प्रकरण : विधिमंडळाच्या नोटिसीला शरद पवार गटाचा ‘करारा जवाब’…

काय म्हणाले रामदास कदम :

मी देखील माध्यमांमधून ऐकले की सिद्धेश कदम लोकसभेला उभे राहणार आहेत. कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिद्धेश कदम यांची काही चर्चा झाली असेल. गजाभाऊ किर्तीकर यांचे आता वय झाले आहे, ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात कदाचित गजाभाऊ किर्तिकर उभे राहिले नाहीत तर या ठिकाणी सिद्धेश कदम उमेदवारी मागतील. तो आपला हक्क आहे आणि अधिकार आहे, पण गजाभाऊ जर का इकडे उभे राहिले तर सिद्धेश कदम उभे राहणार नाहीत, असा दावाही कदम यांनी केला.

भाजपनेही केली तयारीला सुरुवात :

दरम्यान, या मतदारसंघातून भाजपनेही उमेदवारीची तयारी सुरु केली आहे. सध्या उत्तर पश्चिम मतदारसंघाची जबाबदारी आमदार अमित साटम यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. पण साटम यांना तयारीचेही आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. साटम हे दोन वेळा आमदार आहेत. त्यामुळे त्यांनाच आगामी लोकसभेत उमे्दवारी मिळू शकते असा दावा केला जात आहे.

राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे? पुरावेच देतो; शिरसाटांचे थेट चँलेज

गजानन किर्तीकर हेच पुन्हा उमेदवार?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आपण या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवू आणि निवडून येऊ असा दावा खासदार गजानन किर्तीकर यांनी केला होता. तर त्याचवेळी किर्तीकर यांचे सुपुत्र अमोल किर्तीकर हे सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. त्यांना ठाकरे उत्तर पश्चिम मतदारसंघातून मैदानात उतरवू शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे गजानन किर्तीकर पुन्हा उभे राहिल्यास इथे पिता-पुत्र आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube