आमदार अपात्रता प्रकरण : विधिमंडळाच्या नोटिसीला शरद पवार गटाचा ‘करारा जवाब’

आमदार अपात्रता प्रकरण : विधिमंडळाच्या नोटिसीला शरद पवार गटाचा ‘करारा जवाब’

NCP Mla Disqualification Case : विधिमंडळाकडून गत आठवड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना (NCP Sharad Pawar Group)नोटीस (Notice)पाठवली. आमदार अपात्रता प्रकरणी ही नोटीस बजावली होती. उपमुख्यमंत्री अजितदादा गटाकडून (NCP Ajitdada Group)विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांच्याकडे एक याचिका दाखल केली आहे. पक्षविरोधी कृत्य केल्यानं शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र का करु नये? अशी याचिका विधीमंडळात दाखल केली. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या आठ आमदारांना नोटीस पाठवली. त्या नोटिसीला शरद पवार गटाकडून 10 पानी उत्तर देण्यात आलं आहे.

दोन महिन्यांत 650 वेबसाईट्सवर अभ्यास अन् अंबानींना धमकी : पोलिसांनी आठवड्यात केलं गजाआड

अजितदादा गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे एक याचिका दाखल केली. विशेष म्हणजे विधिमंडळाकडून शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. त्यांनतर आता गेल्या आठवड्यात आमदार अनिल देशमुख, राजेश टोपे, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, रोहित पवार, सुमन पाटील, बाळासाहेब पाटील, संदीप क्षीरसागर या आठ आमदारांना नोटीस बजावली.

Pune News : ‘काटेवाडी’त घमासान! अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे वाटले; भाजपाचा गंभीर आरोप

असे असले तरी देखील तीन आमदारांना नोटीस पाठवली नव्हती. आमदार अशोक पवार आणि मानसिंग नाईक यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आमदार नवाब मलिक यांनाही नोटीस पाठवली नाही. आमदार नवाब मलिक यांनी सध्यातरी आपला पाठिंबा कोणत्याही एका गटाला जाहीर केलेला नाही, त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय आहे? याबद्दल माहिती नाही.

मिळालेल्या माहितीनुसार विधिमंडळाच्या नोटिसीला शरद पवार गटाच्या आमदारांनी 10 पानांचं उत्तर दिलं आहे. प्रत्येक आमदाराने दहा पानांचं उत्तर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. त्या आमदारांच्या उत्तरावर राहूल नार्वेकर नेमकी काय निर्णय घेणार? हे आगामी काळात स्पष्ट होईल.

विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रताप्रकरणी निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत दिली आहे. तसेच शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी अंतिम निर्णयासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर लवकरच नियमित सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीच्या प्रकरणावर सुनावणी सुरु होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube