Pune News : ‘काटेवाडी’त घमासान! अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे वाटले; भाजपाचा गंभीर आरोप

Pune News : ‘काटेवाडी’त घमासान! अजित पवार गटाने निवडणुकीत पैसे वाटले; भाजपाचा गंभीर आरोप

Pune News : राज्यात आज ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune News) 231 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर 157 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत सगळीकडे शांततेत मतदान होत असताना अजित पवारांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे. या निवडणुकीत भाजपाचाच पॅनल विरोधात उभा ठाकला आहे. इतकच नाही तर या निवडणुकीत अजित पवार गटाच्या पॅनलकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोपही केला गेल्याने खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत भाजप अजित पवार गटाच्या विरोधात आहे. राज्यात सत्ताधारी पण अजितदादांच्या बालेकिल्ल्यात विरोधात असे चित्र या निवडणुकीत असल्याने येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Supriya Sule : मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती तिघाडी सरकारमध्ये आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल

भाजपाचा आरोप काय ?

भाजपाचे पॅनल प्रमुख पांडुरंग कचरे यांनी अजित पवार गटावर निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप केला. ही निवडणूक गावकऱ्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आहे. गावातील भ्रष्टाचार आणि दहशत कमी करायची आहे. गावात काहीच व्यवस्था नाही. नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी येथील परिस्थिती आहे, असे कचरे म्हणाले. यानंतर अजित पवार गटाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहोत, असे या गटाने स्पष्ट केले.

भाजपने पुरावे द्यावेत- काटे 

काटेवाडीचे माजी सरपंच विद्याधर काटे यांनीही भाजपाचे आरोप फेटाळून लावले. काटे म्हणाले, आम्ही पैसे वाटले नाहीत. काटेवाडी गावात पूर्ण विकास केला आहे. आम्ही भ्रष्टाचार केल्याचे पुरावे भाजपने द्यावेत. आम्ही सुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू शकतो. काटेवाडीत अजित पवार यांच्या मार्गदर्शनात चांगले काम सुरू आहे. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढत आहोत. अजितदादांच्या नेतृत्वात आमचा पॅनेल शंभर टक्के निवडून येईल, असा विश्वास विद्याधर काटे यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar : फडणवीसचं हुकमी एक्का; मंत्रिमंडळ विस्तारावर बोलतांना अजितदादांची कबुली

काटेवाडीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी 

राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका तर 157 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. बारामती तालुक्यात अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीत निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या 16 जागांसाठी मतदान होत आहे. या ग्रामपंचायतीत मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे काटेवाडीची निवडणूक चांगलीच गाजत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube