Pune : हवेली तहसीलदारांवरील ताण कमी होणार; लोणी काळभोरला अप्पर तहसील कार्यालय मंजूर

Pune : हवेली तहसीलदारांवरील ताण कमी होणार; लोणी काळभोरला अप्पर तहसील कार्यालय मंजूर

पुणे : जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हवेली तालुका (Haveli Taluka) प्रशासनावरील ताण आता कमी होणार आहे. हवेली तालुक्यासाठी लोणी काळभोर इथे अप्पर तहसीलदार कार्यालयाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज (2 नोव्हेंबर) जारी करण्यात आला आहे. शिरुरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी समाज माध्यमातून याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले. (State Government approval for Upper Tehsildar Office at Loni Kalbhor for Haveli Taluka)

महसुली मंडळे आणि गावे :

शासन निर्णयानुसार, लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाघोली, उरुळी-कांचन आणि थेऊर ही महसूल मंडळे असणार आहेत. तर यामध्ये एकूण 44 महसुली गावांचा समावेश असणार आहे, तर हवेली तहसीलदार कार्यालयाच्या क्षेत्रात आता खडकवासला, कोथरुड, हडपसर, खेड-शिवापूर आणि कळस ही महसूल मंडळे आणि 86 महसुली गावे राहणार आहेत. यात या कार्यालयासाठी पदांच्या निर्मितीला आणि कार्यालय खर्चाला मंजुरीही देण्यात आली आहे.

Bhide Wada महिनाभरात रिकामा करा, अन्यथा…; SC ने भाडेकरूंचे अपील फेटाळले

अशोक पवार यांनी काय माहिती दिली?

हवेली तालुक्यासाठी नवीन अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती व्हावी यासाठी विधानसभेत केलेली मागणी मान्य झाल्याचा आनंद वाटतो, आपण सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला या निमित्ताने यश आले आहे!

हवेली तालुक्याची लोकसंख्या सुमारे 35 लाखा असून नागरिकरण दिवसेंदिवस वाढत आहे. या एका तालुक्याच्या लोकसंख्येकरिता एक तहसिलदार काम करतात. तर
सिंधदुर्ग जिल्हयाची लोकसंख्या 8 लाख 49 हजार असून यासाठी 8 तहसिलदार काम करतात, गडचिरोली जिल्हा लोकसंख्या 10 लाख 72 हजार असून 12 तहसिलदार,
हिंगोली जिल्हा लोकसंख्या 11 लाख 77 हजार असून 7 तहसिलदार, वाशिम जिल्हा लोकसंख्या 11 लाख 97 हजार असून 6 तहसिलदार, भंडारा जिल्हा लोकसंख्या 12 लाख असून 7 तहसिलदार, वर्धा जिल्हा लोकसंख्या 13 लाख असून 10 तहसिलदार, गोंदिया जिल्हा लोकसंख्या 13 लाख 22 हजार असून 9 तहसिलदार, रत्नागिरी जिल्हा लोकसंख्या 16 लाख 15 हजार असून 9 तहसिलदार काम करतात, त्याच संख्येइतके या ठिकाणी गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपअधिक्षक भूमि अभिलेख, बांधकाम उपअभियंता इत्यादी अधिकारी काम करतात.

त्यामुळे हवेली तालुक्याच्या एवढया मोठया लोकसंख्येचा ताण सबंधित अधिकाऱ्यांवर पडत असल्याने हवेली तालुक्यातील नागरिकांची कामे रखडलेली असून महसूल विभागासह इतर विभागांवर कामाचा ताण मोठया प्रामणावर येत असल्याने नवीन अप्पर तहसिल कार्यालयाची अत्यंत आवश्यकता होती. यापूर्वी 2013 मध्ये पिंपरी चिंचवड करिता अप्पर तहसिल कार्यालय होणेसाठी आपण शासन दरबारी मुद्दा लावून धरला व आपल्या प्रयत्नामुळे तेथे अप्पर तहसिल कार्यालय सुरु झाले.

हवेली अप्पर तहसिल कार्यालयाचा शासन निर्णय निर्गमित झालेला असून सदरचे कार्यालय तत्काळ सुरु होणार आहे. त्यामुळे यापुढे नागरिकांच्या समस्येचे जलदगतीने निराकारण होईल.

Pune News : आयडिया केली अन् थेट तुरुंगात घेऊन गेली! फिल्मी स्टाईल लॅपटॉप चोरणाऱ्याला बेड्या

हवेली अप्पर तहसिल कार्यालय सुरु होणेसाठी उपमुख्यमंत्री मा.नामदार अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री मा.नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मा.श्री.राजेश देशमुख साहेब, जिल्हाधिकारी यांचेकडे वारंवार पाठपुरावा केल्याने याला मुर्त स्वरुप येत आहे व आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यानेच हे घडून येत आहे. त्याबद्दल प्रशासन आणि आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो! असे ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube