Download App

कोल्हे गटाला पुन्हा धक्का! अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे राष्ट्रवादीत…

अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे यांनी आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे.

Mla Aashutosh Kale : कोपरगाव मतदारसंघात कोल्हे गटाला पुन्हा एकदा धक्का बसलायं. अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात दाखल झाले आहेत. आमदार आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मागील दोन दिवसांत कोल्हे गटाला हा दुसरा असल्याचं बोललं जात आहे.

लेकीच्या जीवासाठी AI च्या जंजाळातील बापाची थरारक गोष्ट! ‘द AI धर्मा स्टोरी’चा रंजक ट्रेलर रिलीज

आमदार काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी ऐतिहासिक कामगिरी करतांना 3 हजार कोटींपेक्षा जास्त निधी आणल्याने मतदारसंघातील प्रत्येक गावाला विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला आहे. मागील अनेक वर्षापासून तर काही दशकापासून प्रलंबित असलेली कामे आमदार आशुतोष काळेंनी पंचवार्षिकमध्ये पूर्ण करून दाखविली आहेत. त्यामुळे काळे यांच्या रूपाने एक कर्तबगार लोकप्रतिनिधी मतदारसंघाला लाभला असून आपापल्या गावातील विकासाच्या जास्तीत जास्त समस्या आमदार काळेच सोडवू शकतात, याची प्रत्येक नागरिकांना खात्री पटली आहे.

रावेरच्या आखाड्यात ‘नव्या भिडूं’मध्ये कुस्ती; भाजपचा पैलवान ‘चौधरींना’ थांबवणार?

ज्या करंजी गावाला कोल्हेंची चाळीस वर्ष सत्ता असतांना जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी आमदार काळेंनी या पाच वर्षात एकूण 42 कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे यापुढील काळात करंजी गावाबरोबरच मतदारसंघाचा देखील जास्तीत जास्त विकास व्हावा, या उद्देशातून कामाच्या आमदाराच्या मागे ताकद उभी करण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे यावेळी संचालक विकास शिंदे यांनी सांगितले आहे.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन कारभारी आगवण, सांडू पठाण, गौतम बँकेचे संचालक संजय आगवण, भास्करराव शहाणे, नारायण भारती, चांगदेव कापसे, विजय गायकवाड, गोपाल कुलकर्णी, एकनाथ लांडबिले, उत्तम गायकवाड आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

follow us