Mla Aashutosh Kale : सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याच्या (राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी)) कामासाठी आमदादर आशुतोष काळे (Mla Aashutosh Kale) यांनी मंजूर करून आणलेला 191 कोटी निधीतून सुरु असलेले काम धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना येणाऱ्या अडचणीना सामोरं जाव लागतंय. याची दखल घेत आमदार काळे यांनी आज दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केलीयं. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात, अशीही मागणी काळेंनी केलीयं.
जो काँग्रेस के साथ जायेगा उसका..,; मुनगंटीवारांनी ‘बाळासाहेबां’च्या वाक्याची आठवण करुन दिली
सावळीविहीर फाटा, कोपरगाव,मनमाड ते सेंधवा (म.प्र.) पर्यंत या मार्गाला एन.एच.752 जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर, शिर्डी, अहिल्यानगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग 160 मंजूर करण्यात आलेला आहे. 752 जीच्या सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या 11 किलोमीटर रस्त्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने तब्बल 191 कोटी निधी मिळवून कोपरगावकरांसह या रस्त्याने नियमित ये-जा करणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या रस्त्याचे मागील वर्षी काम सुरु झाले. परंतु सुरु असलेले हे काम अतिशय धीम्या गतीने सुरु असल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतंय. या कामामुळे छोटे अपघात देखील घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे.
या भेटीत आमदार आशुतोष काळे यांनी संसद भवन दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून धीम्या गतीने रस्त्याचे सुरु असलेले काम व त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाची कैफियत त्याच्यापुढे मांडून या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेवून त्यांना आवश्यक सूचना देवून रस्त्याचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण करता येईल यासाठी सहकार्य करावे अशा आशयाचे लेखी निवेदन दिलंय. नितीन गडकरी यांनी आमदार आशुतोष काळे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊन तातडीने बैठक घेवून कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिली असल्याचे आमदार काळे यांनी सांगितलं.