Download App

तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा ; आ. आशुतोष काळेंची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मागणी

Ashutosh Kale on canal water rotation: पाण्याची जास्तीत जास्त बचत करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा अशी मागणी काळे यांनी केलीय.

  • Written By: Last Updated:

Ashutosh Kale on canal water rotation : यंदा सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एक रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन देण्यास सहमती दिली आहे. मात्र पाण्याची जास्तीत जास्त बचत करून तीन आवर्तनाचे चार आवर्तन करा अशी आग्रही मागणी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे केलीय. त्या मागणीला जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय.

कोपरगावकरांचे प्रश्न सुटणार! उद्या आमदार आशुतोष काळेंचा जनता दरबार

अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील राहाता येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीस आ. आशुतोष काळे यांच्या समवेत खा.भाऊसाहेब वाकचौरे, आ. हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, महानंदाचे माजी अध्यक्ष राजेश परजणे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, बाबासाहेब कोते, मुकुंदराव सदाफळ, अभय शेळके, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार अमोल मोरे, दिलीप चौधरी, मच्छिन्द्र चौधरी, आण्णासाहेब कोते, दीपक वाघ, नारायण कदम, शाम जगताप, कैलास आहेर, महेश औताडे, विजय चौधरी तसेच जलसंपदा व कृषी विभागाचे अधिकारी आदी मान्यवरांसह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आशुतोष काळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा दिल्ली-मुंबई एकत्रित विमान प्रवास, अनेक विषयांवर चर्चा…

या बैठकीत आशुतोष काळे म्हणाले की, आपल्याकडे पाणी आहे. पण नियोजन करण्यासाठी कर्मचारी वर्ग अपुरा आहे. त्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नाही ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्यासाठी जल संपदा विभागात नवीन कर्मचाऱ्यांची तातडीने भरती करावी जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी उपलब्ध होईल. ज्या ज्यावेळी पाटबंधारे विभागाकडून आवर्तनाबाबत प्रकटन प्रसिद्ध करण्यात येवून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी आवाहन केले जाते. त्यावेळेस लाभधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी मागणी अर्ज भरावे यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही देखील पाणी मागणी अर्ज भरावेत यासाठी लाभधारक शेतकऱ्यांना आग्रह धरतो. परंतु दिवसेंदिवस पाणी मागणी अर्ज भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने सातत्याने पाणीपट्टीत केलेली वाढ आहे. उन्हाळ्याची पाणीपट्टी तर पाच हजार पर्यंत गेलेली असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

ही वाढलेली पाणीपट्टी भरण्याची आर्थिक परिस्थिती शेतकऱ्यांची नाही. त्यामुळे अर्ज भरण्याची संख्या कमी झाली असल्याचे सांगत त्यासाठी पाणीपट्टीबाबत एक मर्यादा असावी अशी मागणी केली असता त्यावेळी उपस्थित लाभधारक शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या मागणीचे स्वागत केले. मागील काळात महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देतांना साडेसात एचपीपर्यंतच्या वीज पंपाचे वीज बिल माफ केले आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. त्याच पद्धतीने सवलतीच्या किंवा माफक दरात दरात पाणीपट्टी करावी जेणेकरून जास्तीत जास्त लाभधारक शेतकरी अर्ज भरण्यास तयार होतील त्याबाबत योग्य विचार करावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे.

वरचे सर्व धरणे रिकामी केली तरी जायकवाडी धरण भरूच शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याचा आढावा घेणाऱ्या गोदावरी अभ्यास गट दोनने जायकवाडीसाठी ६५ टक्क्यांवरून वरून ५८ टक्के करण्याची शिफारस केली असली तरी या शिफारशी स्वीकारतांना त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येवून अती तुटीच्या गोदावरी खोऱ्याची पाण्याची तुट कशी भरून काढता येईल यासाठी गांभीर्याने विचार करावा अशी मागणी देखील आ. आशुतोष काळे यांनी या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.

follow us