Download App

आमदार आशुतोष काळेंचा कोल्हे गटाला पुन्हा धक्का, महत्त्वाचा पदाधिकारी फोडला

आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जवळपास साडेतीन हजार कोटींचा निधी आणला आहे. निधी मिळविण्याचा त्यांचा सपाटा सुरूच आहे.

  • Written By: Last Updated:

कोपरगावः कोल्हेंच्या कार्यपद्धतीला त्यांचे कार्यकर्ते वैतागलेले दिसत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ सातत्याने सुरु आहे. कोल्हेंच्या अनेक सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष कोल्हे गटाला सोडचिट्ठी देत आहे. मागील काही दशकांपासून एकनिष्ठ असलेले धामोरीचे उपसरपंच शिवाजीराव वाघ यांनी आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी जवळपास साडेतीन हजार कोटींचा निधी आणला आहे. निधी मिळविण्याचा त्यांचा सपाटा सुरूच आहे. आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी दिलेली आश्वासने पूर्ण करताना कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी साडे एक्केचाळीस कोटी निधी दिला आहे. देर्डे फाटा ते भरवस फाटा या रस्त्याला 232 कोटी निधी दिला आहे. त्याचा फायदा धामोरी गावाला होणार आहे.

आमदार आशुतोष काळे यांच्याकडे सामाजिक कार्याचा मोठा वारसा असला तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवर आहेत. एकीकडे कर्तबगार नेतृत्व तर दुसरीकडे फक्त खोटी आश्वासने त्यामुळे नुसते आश्वासन देणाऱ्या संधीसाधूंची साथ देण्यापेक्षा आमदार आशुतोष काळेंसारख्या कर्तबगार नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहून धामोरी गावच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे माजी उपसरपंच शिवाजीराव वाघ यांनी यावेळी सांगितले आहे.

माजी सरपंच शिवाजीराव वाघ यांचे वडील काशिनाथ वाघ हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून कोल्हे गटाचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते होते. कोल्हेंच्या यशवंत कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे चेअरमन, नवसंजीवनी पतसंस्थेचे चेअरमन 15 वर्ष कोल्हे गटाचे धामोरीचे सरपंच म्हणून त्यांनी कारभार सांभाळला आहे. त्यांचा वारसा पुढे चालविताना शिवाजीराव वाघ यांनी धामोरीचे उपसरपंचपदाची जबाबदारी सांभाळत असताना आपल्या कामाची मोहर उमटविली आहे. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सलग्न संस्थांचे आजी-माजी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ व पदाधिकारी उपस्थित होते.

follow us