Download App

विजय औटींच्या आंदोलनातील गुन्ह्यातून आमदार लंकेंची निर्दोष मुक्तता

MLA Nilesh Lanke : जीवन प्राधिकारणामार्फत राबविण्यात आलेल्या पाणी योजनेच्या लोकार्पणासाठी लावण्यात आलेली कोनशिला फोडून पोलीस कर्मचाऱ्यास (Police injured) जखमी केल्याप्रकरणी सन 2007 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पारनेरचे आमदार नीलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांची नगर येथील सत्र न्यायाधीश एम.आर.नातू यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

पुणे महापालिका आयुक्तांचा 2 हजार 300 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

दि. 18 ऑगस्ट 2007 रोजी पारनेर पोलीस (Parner Police)ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप पंढरीनाथ जमदाडे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात नीलेश ज्ञानदेव लंके, लाला साठे दोघेही रा. हंगे ता. पारनेर तसेच इतर वीस जणांविरोधात जीवन प्राधिकरणाच्या पाणी योजनेच्या लोकार्पणाची कोनशिला दगडफेक करून तोडफोड, पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दहशत निर्माण केली. शासकीय कामात अडथळा आणला, तसेच दगड मारून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सन 2004 च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार स्व. वसंतराव झावरे यांचा पराभव करुन शिवसेनेचे विजय औटी (Former MLA Vijay Auti)हे आमदार झाले होते. तत्कालीन आमदार स्व. वसंतराव झावरे यांच्या कार्यकाळात पारनेर शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच पारनेर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पाणी योजनेस मंजुरी मिळून ती कामे सुरू झाली होती.

त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र स्व. वसंतराव झावरे यांचा पराभव झाला. त्यावेळी राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असल्याने दि. 18 ऑगस्ट 2007 रोजी स्व. वसंतराव झावरे यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालय व पाणी योजनेच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)हे दोन्ही कामाचे लोकार्पण करणार होते. या संपूर्ण कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसचीच छाप होती.

दोन्ही कामांचे लोकार्पण करताना स्थानिक आमदार म्हणून शिवसेनेचे आमदार विजय औटी यांना विश्‍वासात घेण्यात आले नाही. स्थानिक आमदाराचा तो हक्क असल्याने त्याविरोधात तत्कालीन आमदार विजय औटी यांनी पारनेर येथे आमरण उपोषण सुरू केले होते. एकीकडे विजय औटी यांचे उपोषण सुरु असताना दुसरीकडे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास नीलेश लंके, लाला साठे व इतर 20 जणांनी हंगा शिवारातील जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजनेच्या टाकीकडे कूच करून कोनशिलेवर दगडफेक करण्यास सुरूवात केली.

त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल जमदाडे व पो. ना. इधाटे यांनी असे करु नका, हे बेकायदेशीर आहे, असे समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता जमावाने दगडफेक करीत कोनशिला फोडून टाकली. दगडफेकीत प्रकाश जमदाडे हे जखमी झाले होते.

Tags

follow us