Download App

महायुती पिक्चरमधून आऊट होणार…; आमदार प्राजक्त तनपुरेंनी डेडलाईन सांगितली

मविआचं सरकार असतांना मतदारसंघात अनेक योजना आणल्या. मात्र, महायुती सरकारच्या काळात अनेक योजना खोळंबल्या. - आमदार तनपुरे

  • Written By: Last Updated:

Prajakt Tanpure : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरेंनी (Prajakt Tanpure) महायुती (Mahayuti) सरकावर जोरदार हल्लाबोल केला. मविआचं सरकार असतांना मतदारसंघात अनेक योजना आणल्या. मात्र, महायुती सरकारच्या काळात अनेक योजना खोळंबल्या, अशी टीका करत तनपुरेंनी केली. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे लाडक्या दाजींना दिवसा वीज कशी मिळेल यावर निर्णय घ्या, अशी मागणीही तनपुरेंनी केली.

सिनेट निवडणुकीत युवासेनेने मारली बाजी, ABVP ला धक्का, जाणून घ्या निकाल 

आज शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रेची सभा राहुरीमध्ये झाली. या सभेला प्रदेशाध्ययक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, मेहबुब शेख, नितेश कराळे आदी नेते उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना आमदार तनपुरे म्हणाले की, पाच वर्ष कशी गेली कळलंच नाही. आपण सर्वांनी मला या मतदारसंघात आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. या पाच वर्षात दिवसरात्र मतदारसंघात प्रत्येक सर्वसामान्य माणसांच्या वेदना समजून घेऊन त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या काळात मतदारसंघात अनेक कामं झाली. मात्र, महायुतीचं सरकार आल्यावर अनेक प्रकल्प अर्धवट राहिले. दोन महिन्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. तेव्हा पुन्हा मतदारसंघाचा कायापालट करणार, असा विश्वासही त्यांनी मतदारांना दिला.

India vs Bangladesh Live : अश्विनने रचला इतिहास, मोडला अनिल कुंबळेचा मोठा विक्रम 

लाडक्या बहिणांना महायुतीने वेठीस धरलं…
आज शिर्डीतील लाडक्या बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील महिलांना नेण्यात आलं. कार्यक्रमाला आल्या नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं. अरे, लाडकी योजना द्यायची तर मोकळ्या मनाने द्या ना, असं म्हणत स्वत:च्या प्रचाराकरता आमच्या लाडक्या बहिणांनाही महायुती सरकारनं वेठीस धरलं, अशी टीकाही त्यांनी केली.

लाडक्या दाजींना दिवसा वीज देणार…
ते म्हणाले, जयंत पाटलांकडे माझा आग्रह आहे की, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना आपण चांगला न्याय देऊच पण, आमच्या लाडक्या दाजींना दिवसा वीज देण्याची भूमिका घेतली पाहिजे. मी अनेकदा महिलांना विचारत असतो काही हवंय का? तर त्या फक्त दाजींकडजे बोट दाखवत असतात. त्यामुळं लाडक्या बहिणींना तर देऊच, पण लाडक्या दाजींसाठी वीज देऊ, असं तनपुरे म्हणाले.

प्रदीपराव बुजाडे यांनी आमच्या विरोधात अनेक निवडणुका लढवल्या. पण, आमचे स्वभाव जुळले आणि आज त्यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामुळं हा फक्त ट्रेलर आहे, अभी पिक्चर बाकी है. हे सगळेचं सत्ताधारी येणाऱ्या काळात पिक्चर मधून आऊट होतील, असंही तनपुरे म्हणाले.

तनपुरे म्हणाले की, पहिल्या अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून अडीच वर्ष सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्या काळात मतदारसंघातील सर्व गावांना पाणी देण्याचं काम जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून करता आलं. निलवंडेचं पाणी राहुरी तालुक्यात येणार हे वाक्य मी प्रत्येक निवडणुकीत ऐकत आलो. पण, कधी पाणी काही आलं नाही. नेते म्हणायचे, पाणी आलं नाही तर जोड्याने मारा. पण, कधी पाणी आलं नाही. जयंत पाटलांनी निळवंडेसाठी साडेबाराशे कोटीचं निधी दिला. तिसगावला दहा दहा दिवस पाणी येत नव्हतं. तर 155 कोटींची योजना आणली. राहुरी तालुक्याला जयंत पाटील यांच्यामुळं पाणी मिळालं हे कुणीही नाकारू शकत नाही, असंही तनपुरे म्हणाले.

follow us