सिनेट निवडणुकीत युवासेनेने मारली बाजी, ABVP ला धक्का, जाणून घ्या निकाल

  • Written By: Published:
सिनेट निवडणुकीत युवासेनेने मारली बाजी, ABVP ला धक्का, जाणून घ्या निकाल

Mumbai University Senate Election : आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा (Mumbai University Senate Election Result) निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेनाने बाजी मारली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांसाठी 24 सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. आज मतमोजणी पार पडली असून निकाल समोर आले आहे.

10 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात होते मात्र मुख्य लढत युवासेना आणि अभाविपमध्ये होती. तर छात्रभारती विद्यार्थी संघटनेने चार आणि मनसेकडून एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. या निवडणुकीसाठी मतदारांची एकूण संख्या 13,406  इतकी होती. मात्र 55 टक्के मतदान झाल्याने  या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागू होते.

या निवडणुकीचा पहिला निकाल युवासेनाच्या बाजूने लागला आहे. ओबीसी प्रवर्गातून युवासेनाचे मयूर पांचाळ यांचा विजय झाला आहे. मयूर पांचाळ यांना 5350 मते पडली त्यांनी अभाविपचे राकेश भुजबळ यांचा पराभव केला. राकेश भुजबळ यांना 888 मते मिळाली.

तर महिला प्रवर्गमधून युवासेना उमेदवार स्नेहा गवळी विजय झाल्या आहेत. त्यांना 5914 मते मिळाली. त्यांनी अभाविपच्या रेणुका ठाकूर यांचा पराभव केला. रेणुका ठाकूरला 893 मते मिळाली. एससी प्रवर्गातून शीतल शेठ देवरुखकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी अभाविपचे राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केला. शीतल शेठ देवरुखकर यांना 5489 मते मिळाली.

India vs Bangladesh Live : अश्विनने रचला इतिहास, मोडला अनिल कुंबळेचा मोठा विक्रम

तर एसटी प्रवर्गातून युवासेनाचे धनराज कोहचडे यांचा विजय झाला असून त्यांना 5247 मते मिळाली. त्यांनी अभाविपच्या निशा सावरा यांचा पराभव केला. याच बरोबर एनटी प्रवर्गातून युवासेनाचे शशिकांत झोरे यांचा विजय झाला असून त्यांनी अभाविपचे अजिंक्य जाधव यांचा पराभव केला आहे. शशिकांत झोरे यांना 5170 मते मिळाली तर अजिंक्य जाधव यांना 1066 मते मिळाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या