Prajakt Tanupure On Shivaji Kardile : आगामी काळात देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत (Legislative Assembly Elections) आहेत. त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. नगर जिल्ह्यात खासदार सुजय विखेंसह (Sujay Vikhe) भाजप नेत्यांनी विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका लावला आहे. विखेंसह शिवाजी कर्डिलेंकडून विकासकामांच्या उद्घाटनांचा नारळ फोडला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनुपुरेंनी (Prajakt Tanupure) यावरूनच शिवाजी कर्डिलेंवर (Shivaji Kardile) जोरदार निशाणा साधला. माजी झाले तरी फुकट नारळ फोडण्याची हौस जात नाही, असा शब्दात त्यांनी कर्डिलेंचा समाचार घेतला.
याला म्हणतात आयत्या पीठावर रेघा ओढणे !!!
ज्या रस्त्याची प्र. मा. आमच्या सरकारच्या काळात झाली (1 एप्रील 2022), तुमच्या सरकारने टेंडर काढायला वर्ष घातलं, विधानसभेत मी लक्षवेधी लावल्यावर तुम्ही टेंडर उघडलत, तुमच्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळालं नाही म्हणून तुम्ही ठेकेदारावर दबाव… pic.twitter.com/g19VoA7SWr
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) January 13, 2024
सिद्धार्थ आनंदचे बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर 5 दिग्दर्शकीय चित्रपट पाहिलात का?
दोनच दिवसांपूर्वी आमदार तनपुरेंनी नगर-मनमाड रस्ता, मुळा डॅम फाटा ते मुळनगर रस्त्याच्यया कामाासाठी रास्ता रोको केलं होतं. यावेळी त्यांनी सरकार विकासकामांमध्ये अडथळे आणत आहे, वेळ काढूपणा करत आहे, अशी टीका केली होती. त्यानंतर आता खा. विखे आणि शिवाजी कर्डिलेंनी या रस्त्याचं उद्घाटन केलं. यावरून तनपुरेंनी कर्डिलेंवर टीकास्त्र डागलं.
‘मला आमंत्रण नाही तरीही अयोध्येला जाणार पण’… शरद पवारांनी बेधडक सांगूनच टाकलं
आमदार तुनपुरेंनी एक फोटो ट्वीट केला. त्यात खासदार सुजय विखेंसह माजी आमदार शिवाजी कर्डिले हे एका रस्त्याचं उद्घाटन करतांना दिसत आहे. तनपुरेंनी लिहिलं की, याला म्हणतात आयत्या पीठावर रेघा ओढणे !!! ज्या रस्त्याची प्रशासकीय मान्यता आमच्या सरकारच्या काळात झाली (1 एप्रिल 2022), तुमच्या सरकारने टेंडर काढायला वर्ष घातलं, विधानसभेत मी लक्षवेधी लावल्यावर तुम्ही टेंडर उघडलत, तुमच्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळालं नाही म्हणून तुम्ही ठेकेदारावर दबाव आणून त्याला काम चालू करू देत नाही, मला नगर मनमाड हायवेवर रास्तारोको करावा लागला आणि वर टोपी करत तुम्ही उद्घाटन करताय, असं तनपुरेंनी म्हटलं.
ज्यांच्यामुळे काम सुरू व्हायला तब्बल दीड वर्ष उशीर लागला, असे उद्घाटनवीर फोटोत दिसताहेत. काहींना माजी झाले तरी फुकट नारळं फोडण्याची हौस जात नाही, अशी टीकाही त्यांनी कर्डिलेंवर केली.
फुटकचे श्रेय घेण्यासाठी धावपळ
याआधीही तनपुरेंनी महायुतीवर सडकून टीका केली होती. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर स्थापनप झालेल्या महायुती सरकारने मागील विविध विकास कामांना स्थगिती दिली होती. त्याचाच फटका विकास कामांना बसला. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रयत्नामुळं सुरू झालेल्या विकास कामाचं फुटकचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी धावपळ करू लागले असा टोला तनपुरेंनी लगावला होता.