सुजय विखेंना राज्यसभेवर पाठविणार, शिवाजी कर्डिलेंचा ‘शब्द’… पण राम शिंदेंचा श्रद्धा व सबुरीचा सल्ला

  • Written By: Published:
सुजय विखेंना राज्यसभेवर पाठविणार, शिवाजी कर्डिलेंचा ‘शब्द’… पण राम शिंदेंचा श्रद्धा व सबुरीचा सल्ला

Shivaji Kardile On Sujay Vikhe Rajya Sabha member : अहिल्यानगर शहरात महायुतीचे आमदार, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा सत्कार सोहळा रंगला आहे. अहिल्यानगर तालुक्याच्या वतीने आमदार शिवाजीराव कर्डिले (shivaji Kardile) यांच्या पुढाकाराने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सत्कार सोहळ्यात जोरदार राजकीय टोलेबाजी झाली. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी साकळाई योजनेवरून पुण्यातील नेत्यांवर टीका केली. प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांचेही खुमासदार भाषण झाले. परंतु हा सत्कार सोहळा रंगला ते माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी कुठेच नसल्याची सल बोलून दाखविल्यावरून.

‘पुरावे असतील, तरच धनंजय मुंडेंवर कारवाई होईल…’ देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

डॉ. सुजय विखे यांचे सर्वात आधी भाषण झाले. ते म्हणाले, जिल्ह्यातून महायुतीचे दहा आमदार निवडून गेले आहेत. तर प्रा. राम शिंदे हे विधानपरिषदेवर गेले. त्यामुळे अभूतपूर्व यश महायुतीला मिळाले आहे. कर्डिलेसाहेबांकडे एकच विनंती आहे की, एक काळ होता मी आजी होतो आणि अनेक जण माजी होते. तुम्हाला तरी गप्पा मारण्यासाठी चार पाच लोक होते. आता मीच एक जण माजी राहिलो आहे, मी एकटा आहे, कुणाकडे जायचे हा प्रश्न आहे. माझेही पुनवर्सन करा, असे सुजय विखे म्हणाले. माजी असलो तरी आजीपेक्षा 50 टक्के जास्त काम करून दाखवेल म्हणत सुजय विखेंनी खासदार लंकेंना नाव न घेता टोला लगावला आहे.

‘आमच्याकडे बोट केलं की, आम्ही दांडूक काढणार!’ प्रताप चिखलीकरांनी अजितदादांसमोरच अशोक चव्हाणांना दम भरला

आमदार कर्डिले म्हणाले, उद्याचे होणार खासदार सुजय विखे हे आहेत. अहो, मी शब्द दिल्यानंतर मी बदलत नाही, मी खात्रीने सांगतो. तुम्हाला वर्षभरात राज्यसभेवर पाठविणार ! तुम्ही चिंता करू नका. प्रा. राम शिंदेंच्या नेतृत्वाखाली तुम्हाला राज्यसभेवर पाठविण्याचे काम केले जाईल. कसे पाठवायचे, याचा निर्णय आम्ही घेऊ. तुम्ही काय चिंता कुठल्या प्रकारची करू नका. आपण सर्वांनी ठरविले तर काही गोष्ट होईल, याची खात्री आहे.

त्यावर विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, शिवाजी कर्डिले यांनी मला विधानपरिषदेवर पाठविण्यासाठी ठराव मांडला होता. त्यामुळे विधानपरिषदेचा आमदार 2022 साली झालो. सुजय विखे यांना ते पुन्हा लोकसभेला पाठवतील, असे म्हणताय असे वाटत होते. परंतु मध्यचे राज्यसभेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जे अगोदर होईल ते होईल. तुमचे पुनवर्सन होईल. मी श्रद्धा आणि सबुरी पाळली. तुम्ही पण पाळा.


मंत्रिपदाची सल बोलून दाखविली

महायुतीचा सरकार आल्यानंतर जिल्ह्याचा सिनिअर आमदार म्हणून मी मंत्री होईल, असे सर्वांना वाटत होते. लाडकी बहिण योजनेमुळे मोनिकाताई राजळे मंत्री होतील, असे वाटत होते. पण राधाकृष्ण विखे यांनी आमच्या मतदारसंघासाठी निधी दिला, कामे केली, तर मतदारसंघातसाठी आम्ही मंत्रीच असल्याचे कर्डिले यांनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube