Ahmednagar News : निळवंडे कालव्यासाठी ज्यांनी कधी पाठपुरावा नाही केला ते कुदळ मारत श्रेय घेताहेत, न केलेल्या विकास कामांचे श्रेय घेणार्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांनी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे नाव न घेता केली. राहुरीत तालुक्यातील गणेगाव येथील नगर-मनमाड रस्ता ते गणेगाव या २ कोटी ३२ लक्ष रूपयांच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
मोठी बातमी! कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल ऑलिम्पिक संघटनेने घेतली, भूपिंदरसिंग बाजवांकडे सोपवली कमान
आमदार तनपुरे म्हणाले, केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न सोडविल्यास तुमच्या कामाचे श्रेय सर्वत्र गुणगाण करू. त्या कामाचे श्रेयही कोणीच घेणार नाही. महाविकास आघाडी शासन काळात कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर केली होती. राज्यात गुवाहाटी दौर्यानंतर अवतरलेल्या नव्या शिंदे-फडणवीस शासनाने अनेक विकास कामांना स्थगिती आणली. तर मंत्रिमंडळ नसल्याने बहुतेक कामे होतच नव्हती.
कामे मंजूर झाल्यानंतर निविदा उघडूनही कामे सुरू होत नसल्याने ठेकेदारांशी चर्चा केली. काहींनी गुपित माहिती देत टक्केवारी ठरत नसल्याने कामास प्रारंभ होत नसल्याचे समजले. कामे झाले पाहिजे म्हणून आरडगाव येथे रस्ता रोको आंदोलन केले. अधिकार्यांवर दबाव आल्यानंतर कामे सुरू झाली. कामे करताना लोकप्रतिनिधीचे शिफारस पत्र महत्वाचे असते. ज्या कामांची शिफारस केली तेच श्रेय मी घेत आहे. दुसर्यांच्या कामाचे श्रेय घेण्यात मला कोणतेही स्वारस्य नाही. आजही केलेल्या कामाचे व मंजूर झालेल्या निधीसाठी केलेल्या पाठपुराव्याचे कागदपत्र माझ्याकडे असल्याचं तनपुरे म्हणाले आहेत.
Pune : अजित पवारांच्या गटाविरोधात भाजप-शिवसेना एकवटले; 800 कोटींच्या निधीवरुन घेतला पंगा
तसेच ज्यांना राहुरी मतदार संघाची १० वर्ष आमदारकी होते त्यांनी कार्यकाळात महत्वाच्या प्रकल्पासाठी कोणताही पाठपुरावा केला नाही. विधानभवनात चुप्पी साधली. निळवंडे कालव्यासाठी एक पैसा आणला नाही. त्यांनी आमच्या काळात मंजूर झालेल्या निधीचे श्रेय घेत निळवंडे कालवा मीच केल्याचा आव आणत कुदळ मारली याचा हिशोब जनता नक्कीच करणार करण्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, निळवंडे कालव्यासाठी जेवढा निधी भाजपने पाच वर्षात दिला त्यापेक्षा तिप्पट निधी महाविकास आघाडी शासनाकउून दोन वर्षातच मिळाला. निळवंडे कालव्याचे संपूर्ण श्रेय हे माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेचे आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी साखर, दाळ वाटप करीत धार्मिक वारीची अनेकांना संधी दिली. यावर मी कधीच टिका केलेली नाही. त्यांचे ते कार्य चांगले असले तरीही त्यांनी दूध व कांदा प्रश्नाबाबत संसदेत आवाज उठवावा ही अपेक्षा असल्याचंही तनपुरेंनी स्पष्ट केलं आहे.