तब्बल 32 वर्ष लढला अन् विजयाचा गुलाल उधळला; अरणगावात लंकेंचा विखे-कर्डिलेंना धक्का!

तब्बल 32 वर्ष लढला अन् विजयाचा गुलाल उधळला; अरणगावात लंकेंचा विखे-कर्डिलेंना धक्का!

Ahmednagar News : काल राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. आागामी विधानसभा निवडणुका आणि राज्यात सुरू असलेले मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर या निवडणुकांना महत्व प्राप्त झाले होते. निवडणुकीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. मतदारांनी प्रस्थापितांना जोरदार धक्के दिले. अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे बालेकिल्ले या निवडणुकीत ध्वस्त झाले. या निवडणुकीत नगर तालुक्यातील अरणगावची निवडणूकही विशेष चर्चेत राहिली. या निवडणुकीत सरपंचपदाचे उमेदवार पोपट पुंड यांना तब्बल 32 वर्षांनंतर निवडणुकीत विजय मिळाला.

नगर जिल्ह्यात 178 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक (Grampanchyat Election) झाल्या यामध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले. मात्र यामध्ये एक निकाल चर्चेत राहिला तो म्हणजे अरणगाव ग्रामपंचायतीचा. वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल 32 वर्षांनंतर वयाच्या 51 व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत थेट सरपंचपदाला गवसणी घातली. पोपट पुंड असे या विजयी उमेदवाराचे नाव आहे. विजयी झाल्यानंतर अख्ख्या गावाने त्यांच्या विजयाचा जल्लोषच रस्त्यावर साजरा केला.

Gram Panchayat Election Result : सर्वच म्हणतात आम्हीच एक नंबर; नक्की गौडबंगाल काय?

नगर तालुक्यातील अरणगावचे सरपंच पोपट पुंड यांनी वयाच्या 20 व्या वर्षी पहिली निवडणूक लढली होती मात्र पदरी निराशाच पडली. त्यानंतर प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावलं. कधी ग्रामपंचायत तर कधी पंचायत समिती निवडणुका लढवल्या. पण तब्बल 32 वर्षे पदरी अपयश पडले. मात्र आज वयाच्या 51 वर्षी त्यांचे निवडणुकीतील अपयशाचं ग्रहण सुटलं आणि ते सरपंचपदी निवडून आले. त्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत अरणगाव ग्रामपंचायतवर आमदार निलेश लंके यांच्या गटाचे पोपट पुंड यांनी 12 सदस्यांसह सरपंचपदावर बाजी मारली. माजी मंत्री शिवाजी कर्डीले व भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव केला. ही निवडणूक शिवाजी कर्डीले व खा. विखे यांच्यासाठी धक्कादायक ठरली आहे.

कर्जतमध्ये रोहित पवारांना धक्का 

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेड ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेड तालुक्यातील एकूण 9 पैकी भाजपने  5 जागा जिंकल्या. नगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये सहा तर जामखेडमध्ये तीन अशा नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कर्जतमध्ये भाजपच्या राम शिंदे यांचे वर्चस्व दिसून आल्याचे दिसते आहे. तर जामखेडमध्ये तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळाला तर भाजपला एका जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान कर्जत जामखेड यांच्या नऊ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले.

विवेक कोल्हेंचा विखेंना आणखी एक धक्का ! मोठ्या ग्रामपंचायती हिसकाविल्या

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube