विवेक कोल्हेंचा विखेंना आणखी एक धक्का ! मोठ्या ग्रामपंचायती हिसकाविल्या

  • Written By: Published:
विवेक कोल्हेंचा विखेंना आणखी एक धक्का ! मोठ्या ग्रामपंचायती हिसकाविल्या

अहमदनगरः गणेश सहकारी कारखाना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या ताब्यातून हिसकावून घेणाऱ्या विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांनी विखेंना आणखी एक झटका दिला आहे. भाजपमध्ये असलेल्या विवेक कोल्हेंनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मदतीने विखेंच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये (Grampanchyat Election) एंट्री केलीय. राहात्यातील तीन ग्रामपंचायतीमध्ये कोल्हे गटाचे सरपंच निवडून आले आहेत. राहाता तालुक्यातील बारा पैकी नऊ ग्रामपंचायतींवर विखेंचे वर्चस्व राहिले आहे.

Gram Panchayat Election Result – सर्वच म्हणतात आम्हीच एक नंबर; नक्की गौडबंगाल काय?

शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या राहाता तालुक्यातील महत्त्वाची गावे पुणतांबा, वाकडी, चितळीमध्ये सत्तांतर झाले आहे. ग्रामपंचायती विखे यांच्या ताब्यात होत्या. आता या ग्रामपंचायती विवेक कोल्हे-थोरात गटाच्या ताब्यात आल्या आहेत. पुणतांब्यामध्ये स्वाती पवार, वाकडीमध्ये रोहिणी आहेर, चितळीमध्ये नारायण कदम हे सरपंच झाले आहेत.

त्याचबरोबर विखे गटाचा बालेकिल्ला असलेल्या काही गावांमध्ये कोल्हे-थोरात गटाचे काही ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. निर्मळ पिंपरी, दाढ बुद्रुक, कोऱ्हाळे, कनकुरी या गावांमध्ये थोरात-कोल्हे गटाचा प्रवेश झाला आहे. कोल्हे हे बाळासाहेब थोरातांच्या मदतीने महसूलमंत्री विखेंना राजकीय धक्के देत आहे. त्यामुळे या भागातील राजकारण भविष्यात आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.

Chagan Bhujbal : बीडमधील हिंसाचार हे गुप्तचर विभागाचं अपयश; भुजबळांचा फडणवीसांवर थेट हल्लाबोल


विखेंचे ९ ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्‍व

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारापैकी नऊ ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम ठेवले आहे. धनगरवाडीच्या सरपंचपदी गोपिनाथ भाऊसाहेब खरात हे विजयी झाले. या ग्रामपंचायतीच्‍या सर्व जागांवर विखे पाटील गटाने विजय मिळविला. कोऱ्हाळेच्या सरपंचपदी पूजा प्रमोद झिंझुर्डे या विजयी झाल्या आहेत. या ग्रामपंचायतीवरही विखे गटाच्‍या जनसेवा मंडळाने आपले वर्चस्‍व राखले आहे. दुर्गापूर ग्रामपंचायत निवडणुकीत नानासाहेब पुलाटे हे विखे गटाचे उमेदवार विजयी झाले आहे. दहेगाव को-हाळे ग्रामपंचायतीमध्‍ये पूनम संदिप डांगे यांनी सरपंचपदावर विजय मिळविला. दाढ बुद्रूक ग्रामपंचायत निवडणुकीमध्‍ये तात्‍यासाहेब नवथान सातपुते हे विजयी झाले आहे. या ग्रामपंचायतीमध्‍ये विखे गटाने १८ जागांवर विजय मिळविला आहे.

रुई ग्रामपंचायत निवडणूकीमध्‍ये शितल संदिप वाबळे या विजयी झाल्‍या आहेत. पिंप्री निर्मळच्या सरपंचपदी पूनम विशाल कांबळे यांनी विजय मिळविला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube