Download App

‘विखेंवर टीका करण्यापेक्षा संगमनेर, संजीवनी कारखाना चालवून दाखवा’

विखेंवर टीका करण्यापेक्षा संगमनेर, संजीवनी कारखान्यात गुंतवणूक करुन चालवून दाखवावा, असं खुलं चॅलेंजच गणेश साखर कारखान्याचे माजी चेअरमन मुकूंद सदाफळ यांनी विरोधकांना दिलं आहे. मागील काही दिवसांपूर्वीच गणेश साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी युती करीत सत्ताधारी विखे गटाला धूळ चारली. या निवडणुकीनंतर थोरात-विखे समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक होत असल्याच पाहायला मिळत आहे. अशातच आता गणेश साखर कारखान्याचे सदाफळ यांनी विरोधकांना खुलं चॅलेंजच दिलं आहे.

हीच ती वेळ ! ‘सजा’कारांनाही शिक्षा द्या; दोघांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा हल्लाबोल

सदाफळ यांनी प्रसिद्ध केलेल्या निवदेनात म्हटलं की, गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाने जिल्हा बॅकेच्या कर्जावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna vikhe patil) यांच्यावर केलेले आरोप कपोकल्पित आणि व्यक्तिद्वेशी भावनेतून असून, कारखाना चालविण्यात येत असलेल्या अपयशाचे खापर दुस-याच्या माथी फोडण्याचा प्रकार आहे. विखे पाटील यांच्यावर टिका करण्यात शक्ती वाया घालविण्यापेक्षा संगमनेर आणि संजीवनीने भांडवल गुंतवून कारखाना चालवून दाखवावा, गणेश कारखान्यावर पुन्हा कर्जाचा बोजा चढवू नका, असे आवाहन सदाफळ यांनी केले आहे.

भाजप-अजितदादा गटात ठिणगी! पडळकरांवर कारवाईसाठी सुनिल तटकरे फडणवीसांनी भेटणार

तसेच गणेश कारखाना निवडणुकीत दोन जबाबदार नेत्यांनी कारखाना यशस्वीपणे चालविण्याचा शब्द निवडणूकीत सभासदांना दिला आहे. आता त्‍यांनीच भांडवलाची गुंवणूक करणे गरजेचे आहे. डॉ.विखे पाटील सहकारी कारखान्याने कारखाना चालविण्यास घेताना स्वत:च्या हिंमतीवर भांडवलाची उभारणी करून सभासद, कामगारांचे हित जोपासले होते. संगमनेर आणि संजीवनी कारखान्याने सुध्दा भांडवलाची उभारणी करुन गणेश कारखाना चालवावा. आता कर्जमुक्त झालेल्या गणेश कारखान्यावर पुन्हा कर्जाचा बोजा चढवू नये, अशी मागणी सदाफळ यांनी केली.

ऊस झोनबंदीचा मुद्दा तापला; वळसे पाटलांचा पुतळा जाळत रयत क्रांती संघटना मैदानात

कारखाना निवडणुकीत सभासदांची दिशाभूल करून तुम्ही विजय मिळवला आहे. सभासदांचा कौल मान्य करून मंत्री विखे पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवून डॉ.विखे पाटील कारखान्याच्या कराराची कोणतीही अडचण गणेश कारखाना चालवितांना येणार नाही असा शब्द केवळ शेतकरी सभासदांच्या हितासाठी दिला. परंतू आज तुम्हाला कारखाना चालविताना येत असलेल्या अडचणीचे खापर विखे पाटील यांच्यावर फोडण्याचा सुरू झालेला प्रयत्न म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याची टिका त्यांनी पत्रकात केली.

भाजप पुन्हा सत्तेत आल्यास देशात रशियासारखी हुकूमशाही येईल; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखाना चालविताना ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांची सर्व देणी दिलीच परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे गणेश कारखाना कर्जमुक्त करून दाखवला आहे. आता त्‍याच गणेश कारखान्‍यावर पुन्‍हा कर्जाचा बोजा चढवू नका अशी मागणी करुन, सदाफळ म्‍हणाले की, कारखाना चालविण्यास घेताना डॉ.विखे पाटील कारखान्याने आर्थिक भार सोसला आहे. गणेश कारखान्‍यावर कोणताही आर्थिक बोजा येवू दिला नाही याचा विसर पडू देवू नका असेही त्‍यांनी सुचित केले.

डॉ.विखे पाटील कारखान्‍याची देणी देण्‍याबाबत कोणतीही चर्चा करायला गणेश कारखान्याचे संचालक तयार नाहीत, परंतू कर्ज किंवा भांडवल उभरता येत नाही म्हणून लगेच विखे पाटील यांना जबाबदार धरणे म्हणजे गणेशच्या संचालकांनी आपली हतबलता स्पष्ट करून दाखवण्या सारखे असल्याचे नमूद करून विखे पाटलांवर टिका करण्यात शक्ति वाया घालविण्यापेक्षा कारखाना चालविण्याचे दायित्व संगमनेर आणि कोपरगावच्या नेत्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

Tags

follow us