ऊस झोनबंदीचा मुद्दा तापला; वळसे पाटलांचा पुतळा जाळत रयत क्रांती संघटना मैदानात
पंढरपूर : राज्यातील ऊस बाहेरच्या राज्यांना देण्यास राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर शेतकरी संघटना आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यात राज्य सरकारची नेहमीच पाठराखण करणारी रयत क्रांती संघटनाही (Rayant Kranti Sanghatna) मागे नाही. आज (18 सप्टेंबर) सरकोली (ता. पंढरपूर जि. सोलापूर) येथे रयत क्रांती संघंटनेच्या आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. (Rayat Kranti Sangathan has protested against sugarcane zone ban)
यावेळी बोलताना रयत क्रांती संघटनेचे कार्याध्यक्ष दीपक भोसले म्हणाले, सरकारने या वर्षीच्या हंगामासाठी ऊसावर झोनबंदी लावली आहे. यापूर्वी 1996 साली सरकारने झोनबंदी लावली होती. स्वर्गीय शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली आणि त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी झोनबंदी उठवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या काढल्या.
देवेंद्र फडणवीसांच्या एन्ट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या नेतृत्वाखालील राजकारण करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी झोनबंदी लावून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
एका बाजूला ऊसाचे उत्पादन घटले आहे. ऊत्पादन खर्च वाढला असताना ऊसाची कांडी ही सोन्याची कांडी आहे, मजुरी वाढली, खताच्या किमती चौपट झाल्या आहेत. नागंरटीचा खर्च वाढला आहे त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नाही. आता सरकारने ऊसासाठी FRP प्रती टन पाच हजार भाव जाहीर करावा. नाहीतर झोनबंदी उठवावी. जर झोनबंदी नाही उठवली तर रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखालील वाजत गाजत बाहेरच्या राज्यात ऊस घेऊन जावू, असा इशाराही दीपक भोसले यांनी दिला आहे.
बोलघेवड्या शिंदे-फडणवीसांपेक्षा ‘मविआ’च बेस्ट; पटोलेंचा पुरावा देत हल्लाबोल
राष्ट्रवादीच्या बैलांना शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका, नाहीतर….
दरम्यान, ‘राज्य सरकारने हा आदेश तत्काळ मागे घ्यावा नाहीतर, राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी या गळीत हंगामात रस्त्यावर उतरेल. राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या शेतावर सोडू नका अन्यथा आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालय हे शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लुटणारे कोठार आहे. जर तुम्ही आमचं खळं लुटणार असाल तर या कार्यालयाला जाळून टाकू’, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी आपला संताप व्यक्त केला.