देवेंद्र फडणवीसांच्या एन्ट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

देवेंद्र फडणवीसांच्या एन्ट्रीनंतरच राज्यातील राजकारण गढूळ, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

Eknath khadse On Devendra Fadnavis : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला वैयक्तिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 2014 मध्ये राज्याच्या राजकारणामध्ये एन्ट्री झाली. त्यानंतर राज्यातील राजकारण गढूळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Dono: ‘दोनों’चा ट्रेलर रिलीज होताच राजवीर झाला भावुक; म्हणाला, ‘माझ्यासाठी…’

आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, मी गेल्या 40 वर्षांपासून राज्याचं राजकारण पाहत आहे. मी आता सातव्यांदा आमदार झालो आहे. राज्यातील राजकारणाचा स्तर 2014-2015 नंतर खाली गेला आहे. 2019 नंतर राजकारणाचा स्तर प्रचंड खाली गेला आहे.

CM Shinde : आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे देऊ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

त्यापूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, सुधाकररवा नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे यांच्यासारखे मुख्यमंत्री होऊन गेले आहेत. त्यांनी कधी आपला संयम सोडला नाही. मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राजकारणाची दिशा बदलत गेली आहे.

फडणवीसांच्या एन्ट्रीनंतर एकमेकांवर सूड उगवायचं राजकारण सुरु झाल्याचं एकनाथ खडसे म्हणाले. मला विरोध करतो का तुला बघून घेतो, असं राजकारण सुरु झालं. त्यासाठी ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा शस्त्रांचा वापर केला जाऊ लागल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube