Sugar Factory Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळ निवडणुकांमध्ये गडाख आणि राजळे गटाने आपले वर्चस्व कायम राखलंय. मुळा (Mula Sahakari Sakhar Karkhana) सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या सहकार पॅनलने एकहाती सत्ता कायम राखत विरोधकांचा दारुण पराभव केला. तर श्री वृद्धेश्वर (vruddheshwar) सहकारी साखर कारखान्यात आमदार मोनिका राजळे (Monika Rajale)यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने उर्वरित दोन्ही जागांवर विजय मिळवत सर्व 19 जागांवर कब्जा केला आहे.
अनोखळी नंबरवरून मेसेज आल्यास WhatsApp चं सांगणार चॅट करायचं की नाही…वाचा डिटेल्स
नेवाशातील मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीनंतर गडाख यांच्या सहकार पॅनलचे 21 पैकी 17 उमेदवार बिनविरोध निवडून आलरे होते. उर्वरित चार जागांसाठी झालेल्या मतदानातही गडाख पॅनलने सुमारे सहा हजार मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत कारखान्यावरील आपली एकहाती सत्ता कायम राखली.
आप्पासाहेब राजळे व उध्दव वाघ कासार पिंपळगाव गटातून विजयी
श्री वृध्देश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत कासार पिंपळगाव गटातून आप्पासाहेब दादाबा राजळे व उध्दव रघुनाथ वाघ विजयी झाले आहेत. कारखान्याचे विद्यमान चेअरमन आप्पासाहेब राजळे यांना 4932 मते तर विद्यमान संचालक उद्धव वाघ यांना 4158 मते मिळाली. तर विरोधी उमेदवार शिवशंकर राजळे यांना 1642 मते मिळाली. दोन जागेसाठी झालेल्या तिरंगी लढतीत सर्वाधिक मते आप्पासाहेब राजळे यांना मिळाली.
तर व्दितीय क्रमांकाची मते उद्धव वाघ यांना मिळाल्याने हे दोन्ही उमेदवार विजयी झाले. तर शिवशंकर राजळे यांचा पराभव झाला. यापूर्वी आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली 19 पैकी 17 संचालक बिनविरोध झाले आहेत. तर दोन जागांसाठी ही निवडणूक झाली. या दोन्ही जागा आमदार राजळे गटाने जिंकल्या.
