Musical Fountain In Ahmednagar : नगर जिल्हा देखील विकासाच्या दृष्टीने एक एक पाऊले टाकत आहे. ऐतिहासिक नगर शहराच्या विकासासाठी आता प्रशासन देखील सरसावले आहे. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्र असून भाविकवर्ग दर्शनासाठी येत असतात. नगर शहरामध्ये ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शहरात दोन म्युझिकल फाउंटन मंजूर करण्यात आले. लवकरच शहराच्या सौंदर्यात भर घालणारे म्युझिकल फाउंटन शहरात साकारणार आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून साकारत असलेल्या बुरुडगाव रोड साईनगर उद्यान येथील म्युझिकल फाउंटनच्या कामाची पाहणी करण्यात अली यावेळी ते बोलत होते. नगर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे दोन म्युझिकल फाउंटनचे काम सुरु आहे. यामध्ये बुरुडगाव रोड साईनगर उद्यान येथे म्युझिकल फाउंटनचे काम सुरु असून लवकरच नगरकरांसाठी ते खुले होणार आहे. याचबरोबर सावेडी गंगा उद्यान येथे म्युझिकल फाउंटनचे काम लवकरच सुरु होईल, नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच शहरात दोन म्युझिकल फाउंटन साकारत आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने पाहण्यासाठी येतील.
नगरच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा
पर्यटन विकासाला चालना मिळणार
या म्युझिकल फाउंटनच्या माध्यमातून पर्यटन विकासाला चालना मिळेल. पर्यटनांमुळे रोजगार निर्मिती होत असते, हे भव्य दिव्य म्युझिकल फाऊंटन नक्कीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल. यामुळे शहराचाही नावलौकिक वाढेल आणि महानगरचे रूप प्राप्त होईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
या प्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त पंकज जावळे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, शहर अभियंता मनोज पारखे, इंजि.श्रीकांत निंबाळकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, अंकल चवंडके आदी उपस्थित होते.