नगरच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा

नगरच्या सुपुत्राचा सातासमुद्रापार झेंडा

Army Officer Aman Jagtap : फ्रान्स सरकारच्य वतीने दरवर्षी 14 जुलै रोजी ‘बॅस्टिल डे संचलना’चे आयोजन केले जाते. फ्रान्सच्या इतिहासात या दिवसाला फार मोठे महत्व आहे. यंदाच्या वर्षी ‘बॅस्टिल डे’च्या संचलनासाठी मुख्य अतिथी म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान मोदींसोबत भारतीय लष्कराची एक तुकडी फ्रान्समध्ये संचलनासाठी जाणार आहे. संचलनासाठी निवडण्यात आलेल्या ६० जवानांच्या तुकडीचे नेतृत्व अहमदनगरचे कॅप्टन अमन जगताप हे करणार आहेत. अर्थातच नागरकरांसाठी हि एक अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

बॅस्टिल डे नेमकं आहे तरी काय जाणून घेऊ
फ्रान्समध्ये आंदोलकांनी १४ जुलै १७८९ रोजी प्रसिद्ध बॅस्टिल किल्ला व तुरुंगावर हल्ला करत ताबा मिळविला होता. ही घटना फ्रेंच राज्य क्रांतीची सुरुवात मानली जाते. यामुळे १८८० पासून दरवर्षी १४ जुलै रोजी ‘बॅस्टिल डे परेड’चे आयोजन केले जाते. यानिमित्त पॅरिस शहरात लष्करी संचलन आणि आतषबाजी केली जाते. फ्रान्समधील सर्वांत मोठे आणि जुने लष्करी संचलन आहे. या कार्यक्रमासाठी अमन हे फ्रान्सला जाणार आहे.

‘आम्हीही नाराजी व्यक्त केली पण आमच्यावर’.. कायदेंच्या पक्षप्रवेशावर पाटील स्पष्टच बोलले

अमन जगताप यांच्याविषयी जाणून घ्या
अमन हनुमान जगताप यांचा जन्म पुणे येथे १८ ऑक्टोबर १९९६ रोजी झाला. त्यांनी त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केले. पुढील शिक्षणसाठी त्यांनी अहमदनगर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सैन्य दलात भरती होण्याच्या इच्छेने त्यांनी एनसीसीत प्रवेश घेतला. याचेच पुढचे पाऊल म्हणजे २६ जानेवारी २०१५ रोजी राजपथावर ‘एनसीसी’चे नेतृत्व करण्याचा मान अमन यांना मिळाला होता.

जाहिरातीची धास्ती अन् दिल्लीतून फोन : फडणवीसांच्या ट्विटचं कारण ठाकरेंनी सांगितलं

लष्करात दाखल होण्याचा प्रवास
‘एनसीसी यूथ एक्सचेंज प्रोग्राम’अंतर्गत २०१६ मध्ये भूतान येथील १५ दिवसांच्या शिबिरासाठी त्यांची निवड देखील झाली होती, त्यानंतर लवकरच भारतीय सैन्यदलामध्येही अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या प्रशिक्षणाला २०१९ मध्ये सुरवात झाली. ट्रेनिंग पूर्ण करताच ७ मार्च २०२० रोजी लेफ्टनंट या पदावर त्यांची नेमणूक झाली. ‘२३- पंजाब रेजिमेंट’मध्ये अमन दाखल झाले व त्यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर ते कॅप्टन बनले. यशाचे शिखर सर करणारे अमन आता फ्रान्सला निघाले आहेत. ते फ्रान्सच्या बॅस्टिल डे संचलनामध्ये ६० जवानांच्या पंजाब रेजिमेंटचे नेतृत्व करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube