Download App

नगर-आष्टी रेल्वेला लागलेली आग आता संशयाच्या भोवऱ्यात, थेट रेल्वे मंत्र्यांकडेच तक्रार

  • Written By: Last Updated:

Nagar-Ashti Railway: नगर-आष्टी रेल्वे सेवा (Nagar-Ashti Railway) अनेक वर्षानंतर सुरू झाली. या रेल्वेला प्रवासांचा अल्प प्रतिसाद होता. केवळ सात ते आठ व्यक्तीच या रेल्वेने प्रवास करत होते. सोमवारी दुपारी न्यू आष्टी (New Ashti)रेल्वे स्थानकाकडून रेल्वेगाडी नगरकडे येत होते. नगर तालुक्यातील शिराढोण येथे रेल्वेच्या पाच डब्यांना (बोगींना) भीषण आग लागली. गाडीत दहाज-बारा प्रवासी होते. ते सुरक्षितपणे बाहेर पडले. या रेल्वेला आग का ? लागली हे अद्याप समोर आलेले नाहीत. परंतु आता रेल्वेला लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दाक्षिणात्य ‘सैंधव’ सिनेमात Nawazuddin साकारणार खलनायकाची भूमिका; दमदार टीझर प्रदर्शित

सोमवारी उशीरा सुटलेल्या अहमदनगर-आष्टीला रेल्वेला लागलेल्या भीषण आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी अहमदनगर पुणे इंटरसिटी रेल्वे कृती समितीचे हरजितसिंह वधवा व सोलापूर विभागीय सल्लागार समिती सदस्य प्रशांत मुनोत यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन तातडीने रेल्वेचे महाप्रबंधक, सोलापूर विभागीय रेल्वे प्रबंधक आणि रेल्वेमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बीड-परळी रेल्वे मार्गावरील अहमदनगर-आष्टी ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती. सोमवारी ही रेल्वे आष्टीकडे जाताना सुमारे तीन तास उशिरा निघाली. परत येताना देखील ती रेल्वे उशीराच होती. दुपारी साडेतीनच्या दरम्यान सोलापूरवाडी- वाळूंज मार्गावरील रेल्वे क्रॉसजवळ असताना इंजिन शेजारील चार-पाच डब्यांना भीषण आग लागली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.


Gopichand Padalkar : साहेब,ताई अन् दादा, एसटीडीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा; पडळकरांचा पुन्हा पवारांवर निशाणा

या गाडीत नेहमीच प्रवासी कमी असतात. तर गाडी उशिरा सुटल्याने प्रवासी अजूनही कमी होते. जे दहा-बारा प्रवासी होते. त्यांनी आग लागल्यानंतर उडी मारून स्वतःचे जीव वाचविले. सुदैवाने कुठल ही जीवितहानी झाली नाही.

आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरिक, अग्निशमक दलाने प्रयत्न करुन रेल्वे डब्यांना लागलेली आग विझवली. जेव्हापासून ही गाडी सुरू झाली, तेव्हापासून अनेक लोकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यापूर्वी या रेल्वेचे दोन फेऱ्या होत होते. परंतु त्या रद्द करून एक फेरी करण्यात आली. अशा परिस्थितीमध्ये गाडी उशिरा का सुटली?, सदर गाडीला आग कस काय लागली? हा मोठा प्रश्‍न आहे. गाडी आज उशिरा सुटल्याने त्यात काही घातपात करण्याचा उद्देश होता का? या सर्व प्रश्‍नांची उकल होण्यासाठी अहमदनगर-आष्टीला रेल्वेला लागलेल्या भीषण आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे वधवा व मुनोत यांनी निवेदनात म्हटले आहे.


उद्यापासून रेल्वेच बंद

न्यू आष्टी-अहमदनगर (डेमू) ट्रेन रद्द
करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीचा रॅक उपलब्ध नसल्यामुळे 17 ऑक्टोबर ते पुढील आदेश येईपर्यंत ट्रेन द्द करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने ठरविले आहे.

Tags

follow us