Download App

नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको; आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली

राहुरीत नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवल्याचा प्रकार घडलायं.

Nagar-Manmad Highway Protest : नगर-मनमाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलकांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवल्याचा प्रकार राहुरीत घडलायं. दरम्यान, राहुरी रस्ता कृती समितीच्यावतीने आज राहुरीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. याचवेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया शिर्डीकडे जात होते. यावेळी त्यांची गाडीच आंदोलकांनी अडवली. जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलकांनी घेराव घातल्याने पोलिस प्रशासन गोंधळून गेले.

ते शैलीमुळे झालं पण “चहापेक्षा किटली गरम असणारे”… अजितदादांची पाठराखण करत रोहित पवारांचा रोख कुणाकडे

नगर-मनमाड रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून अक्षरशः चाळण झाली आहे. अनेक ठेकेदार बदलले गेले. मात्र, हा रस्ता काही केल्या पूर्ण झाला नाही. स्थानिक राजकारण तसेच ठेकेदारांना होणारा त्रास यामुळे हा रस्ता वर्षानुवर्षे प्रलंबित राहिला. मात्र, रस्त्याची झालेली दुरवस्था यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत या रस्त्याने करावी लागत आहे. यातच जागोजागी खड्डे झालेले असल्याने या ठिकाणी अपघातांची संख्या देखील वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात या रस्त्यावर झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. यामुळे आता राहुरी कर चांगलेच संतापले आहे.

ते शैलीमुळे झालं पण “चहापेक्षा किटली गरम असणारे”… अजितदादांची पाठराखण करत रोहित पवारांचा रोख कुणाकडे

आज राहुरी रस्ता कृती समितीच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. वर्दळीचा असलेल्या मार्गावर या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या मोठ्या रांगा दुतर्फा लागल्या होत्या. यातच नगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया हे कामानिमित्त शिर्डीकडे चालले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं गाडी अडवली. या घटनेने पोलीस प्रशासन देखील गोंधळले गेले. जिल्हाधिकारी यांना देखील नागरिकांच्या भावना समजल्या पाहिजे असे म्हणत आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडी जाऊन देणार नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी दुसऱ्या पर्यायी मार्गाने शिर्डीकडे रवाना केली. मात्र, या घटनेमुळे जिल्हाधिकारी आशिया हे चांगलेच संतापले त्यांनी पोलीस प्रशासनाला देखील धारेवर धरले असल्याचे बोलले जात आहे.

माजी मंत्री तनपुरे यांनीही केले आंदोलन…
नगर-मनमाड रस्त्याची झालेली दुरवस्था. यावर झालेले अपघात यामुळे निष्पाप वाहनधारकांचा मृत्यू होतो आहे. कोट्यवधी खर्च करूनही हा रस्ता प्रलंबित का राहतो. वाहनधारकांच्या मृत्यूचा अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली होती.

follow us