ते शैलीमुळे झालं पण “चहापेक्षा किटली गरम असणारे”… अजितदादांची पाठराखण करत रोहित पवारांचा रोख कुणाकडे

Rohit Pawar यांनी कुर्डू प्रकरणी दोनदा अजित पवारांची पाठराखण करत राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर टीका केली आहे.

Rohit Pawar

Rohit Pawar Backing Ajit Pawar in Anjana Krushna case also criticize NCP politics : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि एका महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा (Anjana Krushna) यांचा फोनवर बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये अजित पवार महिला अधिकाऱ्याला दम देत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. अशातच अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी दोनदा या प्रकरणी अजित पवारांची पाठराखण करत राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर टीका केली आहे.

काय म्हणाले रोहित पवार

कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकारी यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती पण त्याठिकाणी झालेला घोळ अजितदादांच्या हिंदीमुळे आणि बोलण्याच्या शैलीमुळे झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याबद्दल स्वतः अजितदादांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही जाणूनबुजून काही प्रामाणिक पण सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे हे मात्र नक्की ! मित्रपक्षांच्या नेत्यांची विनाकारण मीडिया ट्रायल करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची, युवांच्या प्रश्नांची, महिला सुरक्षेच्या विषयाची, पुरावे दिलेल्या भ्रष्टाचार प्रकरणांची मीडिया ट्रायल करून राज्याच्या नेतृत्वाने कार्यवाही केली तर अधिक योग्य राहील!

https://x.com/RRPSpeaks/status/1965608779493539971

राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल घेतली जात असताना पक्षाच्या दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेत्यांनी मात्र कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करणे कितपत योग्य आहे? असो पक्षात “चहापेक्षा किटली गरम असणारे” एक दोन सहकारी असले की आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल.

ब्रेकिंग : मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारने घेतला आणखी एक धडाकेबाज निर्णय

दरम्यान रोहित पवार यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना रागावल्याच्या प्रकरणी अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी दोनदा या प्रकरणी अजित पवारांची पाठराखण करत राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारणावर टीका केली आहे. त्यांचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्न पडला आहे. कारण रोहित पवारांनी अजित पवारांच्या पक्षातील दोन तीन नंबरच्या जेष्ठ नेते कुरघोड्या करणाऱ्या मित्रपक्षाला प्रो भूमिका घेऊन आपल्याच पक्षात स्वहितासाठी अंतर्गत कुरघोड्या करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच ते म्हणाले की, आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही, याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल. असं म्हणत त्यांनी अजित पवारांनी देखील टोला लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube