Download App

Nashik News : पाण्याचं भांडण थेट कोर्टात! जायकवाडीला पाणी देण्याविरोधात याचिका

Nashik News : जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या (Jayakwadi Dam) मागणीवरून नगर-नाशिक आणि मराठवाड्यात ऐन (Nashik News) दिवाळीत संघर्ष धुमसू लागलेला असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. समन्यायी पाणी वाटप तत्वाचा मेंढेगिरी समितीचा अहवाल चुकीचा असून आकडेवारीचा कुठेही ताळमेळ नाही. त्यामुळे हा अहवाल रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाच्या भाजपा प्रमुख अमृता पवार यांना न्यायालयात धाव घेतली आहे. तर दुसरीकडे मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे आता पाण्याचा हा वाद आणखी वाढण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गंगापूर समुहातून 500 दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून 2643 दलघफू, मुळा समुहातून 2100 दलघफू, प्रवरा समुहातून 3360 असे नाशिक आणि नगर जिल्ह्यातून एकूण 8603 दलघफू पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्या भाजपा आमदार आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केला. आंदोलनेही करण्यात आली.

Ahmednagar News: पाणीप्रश्न पेटणार! विरोध, आंदोलन, तरी नगरहून आज जायकवाडीला पाणी सोडणार

जर जायकवाडी धरणात पाणी सोडल्यास त्याचा मोठा फटका नगर आणि नाशिक जिल्ह्याला बसेल. येथेही दुष्काळसदृश्यच परिस्थिती आहे. पाणी कमी झाल्याने पिके संकटात सापडतील. तसेच सध्या पाणी सोडले तर 30 ते 40 टक्के पाण्याचा अपव्यय होईल असे सांगण्यात येत आहे. या समस्या टाळण्यासाठी जायकवाडीतील मृतसाठ्याचा वापर करण्याची मागणी आता होत आहे.

अशा परिस्थितीत जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात आमदार फरांदे यांच्या नेतृत्वात थेट न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर आता पुढील सुनावणी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर अमृता पवार यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडू नये यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महामंडळाच्या पाणी सोडण्याच्या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.

‘त्या’ आदेशाचा कर्ता कोण ?

याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये सरकारने धरणांतील जलसाठ्याचा जपून वापर करण्याचे निर्देश दिले होते. तरीही मार्च, एप्रिल व मे 2023 या काळात जायकवाडी धरणातून पाणी सोडले गेले. दुष्काळी परिस्थिती असताना उन्हाळ्यात पाणी सोडले गेले. जायकवाडी धरण खरीप हंगामासाठी आहे. त्यामुळे कोणत्या निकषावर आणि कुणाच्या आदेशावरून पाणी सोडले गेले असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

Ahmednagar News : पाणीबाणी! काही होऊ जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही..

 

Tags

follow us