Nashik News: चाळीस लाखांची लाच मागितली ! दिंडोरीचा प्रांताधिकारी एसीबीच्या ‘जाळ्यात’

  • Written By: Published:
Nashik News: चाळीस लाखांची लाच मागितली ! दिंडोरीचा प्रांताधिकारी एसीबीच्या ‘जाळ्यात’

Nashik Bribe News: पुण्यातील आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड यांच्याविरोधात लाचखोरीची कारवाई झाल्यानंतर आता नाशिकमध्येही प्रांताधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकला आहे. दिंडोरीचे (Dindori) प्रांताधिकारी निलेश अपार यांच्यावर चाळीस लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीने (ACB) कारवाई केली आहे. अपार यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (nashik news a bribe of fourty lakhs was demanded fir against revenue-officer)

विद्यार्थ्याची फसवणूक, शैक्षणिक कर्जाच्या नावावर ३७ लाखाचा गंडा; कागदपत्रावर उचलले वैयक्तिक कर्ज

या अधिकाऱ्याने एका खासगी कंपनीची जागा एनए (नाॅन अग्रिकल्चर) करून देण्यासाठी तब्बल चाळीस लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांची दिंडोरीत कंपनी आहे. या कंपनीचे बांधकाम करताना एनएची परवानगी घेतली नव्हती. प्रांताधिकारी अपार यांच्याकडून कंपनी मालकाला नोटीस बजाविण्यात आली होती. या कंपनीवर कारवाई न करण्यासाठी, बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तब्बल पन्नास लाखांची मागणी केली होती.

ICC World Cup 2023 : विदर्भाची बाजू घेणं योग्यच आहे, पण… अनिल देशमुखांसाठी रोहित पवारांचं ट्विट

परंतु तडजोडीनंतर कंपनीच्या मालकाने चाळीस लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. पण लाच न देता कंपनी मालकाने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाच मागितल्याची पडताळणी एसीबीने केली होती. त्यात प्रांताधिकारी यांनी लाच मागितल्याचे आढळून आले होते. परंतु अधिकाऱ्याने संशय आल्यानंतर लाच स्वीकारली नाही. लाच मागितल्याप्रकरणी या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या अधिकाऱ्याला अद्याप अटक केलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube