ICC World Cup 2023 : विदर्भाची बाजू घेणं योग्यच आहे, पण… अनिल देशमुखांसाठी रोहित पवारांचं ट्विट
अनिल देशमुख साहेब विदर्भाची बाजू घेणं योग्यच पण खेळात कोणताही भेदभाव केला जात नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री अनिल देशमुखांसाठी ट्विट केलं आहे. दरम्यान, आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC One Day World Cup 2023) चे वेळापत्रकानूसार एकही सामना विदर्भातील नागपुरात खेळवला जाणार नाही. यावरुन अनिल देशमुखांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ट्विट करीत रोहित पवारांनी अनिल देशमुखाांना सामने पाहायला येणाचं आवाहन केलंय.
साहेब आपण विदर्भाची बाजू घेणं योग्यच आहे, पण खेळात कोणताही भेदभाव केला जात नाही. विदर्भात सामने होणार नसल्याची आपली नाराजी असली तरी #ICC च्या निकषाप्रमाणे ६ किंवा ८ ठिकाणीच सामने व्हायला पाहिजेत. पण आज बीसीसीआयने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे भारतात प्रत्यक्ष १० ठिकाणी सामने तर २… https://t.co/GAagqs4hXH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 28, 2023
आमदार रोहित पवार म्हणाले, साहेब आपण विदर्भाची बाजू घेणं योग्यच आहे, पण खेळात कोणताही भेदभाव केला जात नाही. विदर्भात सामने होणार नसल्याची आपली नाराजी असली तरी ICC च्या निकषाप्रमाणे ६ किंवा ८ ठिकाणीच सामने व्हायला पाहिजेत.
Pune News : हल्ला झालेली ‘ती’ मुलगी MPSC करणारी नव्हती, पोलिस उपायुक्तांनी सांगितली खरी माहिती…
आज बीसीसीआयने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे भारतात प्रत्यक्ष 10 ठिकाणी सामने तर 2 ठिकाणी सराव असे एकूण 12 ठिकाणी सामने होणार आहेत. देशातील स्टेडियमच्या संख्येचा विचार करता काही राज्यांवर नक्कीच अन्याय झाला असेल पण महाराष्ट्रात सर्वाधिक सामने होणार असल्याने याबाबत मी BCCI आणि ICC चे महाराष्ट्राच्यावतीने आभारही मानले आहेत. हे सामने पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र येणार असून आपणही जरुर या, या शब्दांत रोहित पवारांनी देशमुखांना सामने पाहायला येणाचं निमंत्रणचं दिलं आहे.
ODI WC 2023 : माघार घेता येणार नाही; ICC कडून पाकिस्तानला कराराची आठवण
काल आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. वेळापत्रकानुसार भारतात एकूण 12 ठिकाणी विश्वचषक सामने खेळवले जातील. मात्र, वर्ल्डकपचा एकही सामना नागपुरात होणार नाही. महाराष्ट्रात नागपूर वगळता पुणे आणि मुंबईत सामने खेळवले जाणार आहेत. विदर्भात मात्र, एकही सामना खेळवला जाणार नसल्याने विदर्भवासियांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या नाराजीवर ट्विटरवर पोस्ट शेअर करीत आमदार पवारांनी विदर्भवासियांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच नाहीतर त्यांनी विशेष प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात अधिक सामने खेळवले जाणार असल्याचंही म्हटलं आहे. त्यामुळे आता पवारांच्या आवाहनानंतर माजी मंत्री अनिल देशमुख काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.