ODI WC 2023 : माघार घेता येणार नाही; ICC कडून पाकिस्तानला कराराची आठवण
ODI WC 2023 : ICC कडून काल (दि. 27) एकदिवसीयय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) नाराजी व्यक्त करत खोडा घालण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर ICC कडून PCB ला कराराची आठवणकडून देत माघार घेता येणार नसल्याचे म्हटले आहे.
पीसीबीकडून मंगळवारी एक निवेदन देण्यात आले आहे. ज्यात अद्याप पाकिस्तान सरकारकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळालेले नाही. त्यामुळे विश्वचषकासाठी भारतात जाण्याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. त्यानंतर यावर आयसीसीने प्रतिक्रिया दिली असून, पीसीबीकडून करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे.
‘‘पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्यासाठी करार केला असून, आम्हाला आशा आहे की, ते हा करार मोडणार नाही आणि भारतात आयोजित होणाऱ्या स्पर्धेत ते सहभागी होतील. विश्वचषकात सहभागी होणारे सर्व संघ आपापल्या देशाच्या नियमांना बांधील आहेत आणि आम्ही त्याचाही आदर करतो. मात्र, विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तान नक्कीच भारतात येईल, असा आम्हाला विश्वास असल्याचे आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जॉर्ज बार्कले यांनी म्हटले आहे.
2016 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तान शेवटचा सामना भारतात खेळला होता. उभय देशांमधील संबंध तणावामुळे दोन्ही संघ फक्त आयसीसी टूर्नामेंट किंवा आशिया कपमध्ये एकमेकांशी खेळतात. हे दोन सामने हलवण्याची पाकिस्तानची विनंती बीसीसीआयने फेटाळली. हे जवळजवळ निश्चित होते, कारण ते सामान्यत: सुरक्षा धोक्याच्या परिस्थितीतच अशा विनंत्या स्वीकारतात. पीसीबीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका आता 17 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने, विश्वचषकाच्या वेळापत्रकावर बोर्ड काय प्रतिक्रिया देते हे पाहणे बाकी आहे. नजम सेठी यांच्या राजीनाम्यानंतर हंगामी अध्यक्ष अहमद शहजाद फारूख राणा बोर्डाचे कामकाज पाहत आहेत.
वरिष्ठ IRS अधिकारी ईडीच्या जाळ्यात; 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ठोकल्या बेड्या
15 ऑक्टोबरला भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार
यंदाच्या वर्षी भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक ICC ने जाहीर केले असून, या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 2019 मध्ये या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता ज्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार असून, 15 ऑक्टोबरला भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे.
‘वानखेडे’चं महत्त्व संपलं?; IPLनंतर वर्ल्डकपचा अंतिम सामनाही गुजरातमध्ये!
भारताचे सामने कधी
8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू