Maharashtra Cabinet Decisions : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक! वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुला सावरकरांचं नाव

Maharashtra Cabinet Decisions : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक! वांद्रे-वर्सोवा सागरी सेतुला सावरकरांचं नाव

Maharashtra Cabinet Decisions : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य सरकारने राज्यातील काही शहरांची नावे बदलली. त्यानंतर आता सरकारने वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले. तसेच एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.

वांद्र वर्सोवा येथील सागरी सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. यानंतर विरोधी पक्ष काँग्रेसकडून सातत्याने टीका केली जात होती. ही घोषणा कधी होणार याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अखेर सरकारने आज हा निर्णय जाहीर करून टाकला. वांद्र वर्सोवा सागरी सेतू आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने ओळखला जाणार आहे. इतकेच नाही तर एमटीएचएलला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णयही शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय 

  • वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव
  • एमटीएचएल ला अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव
  • राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटीस मान्यता
  • भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभ
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित. २ कोटी कार्ड्स वाटणार
  • आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार.
  • संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ
  • आता असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ सुरू करण्याचा निर्णय
  • नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश
  • मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.
  • पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
  • मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड
  • भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
  • राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता
  • बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय
  • दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबवणार
  • दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ मिळणार
  • सर जे जे कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
  • गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
  • ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube