वरिष्ठ IRS अधिकारी ईडीच्या जाळ्यात; 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ठोकल्या बेड्या

वरिष्ठ IRS अधिकारी ईडीच्या जाळ्यात; 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात ठोकल्या बेड्या

वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करत त्यांना अटक केली आहे. ईडीने मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेले सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता. सावंत हे याआधी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत सावंत यांच्या घरी ईडीचा तपास सुरू होता. सावंत हे आधी ईडी विभागातच मुंबई झोन 2 मध्ये कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणाच चौकशी केली होती. काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे 500 कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. या प्रकरणी सावंत यांनी चौकशी केली होती.

सीबीआय देखील या प्रकरणाचा तपास करत होती. ईडीचाही तपास सुरू होता. त्यानंतर ईडीने काल त्यांच्या घरी छापेमारी केली. सावंत सध्या लखनौ येथे कस्टम आणि जीएसटी विभागात कार्यरत होते. तेथूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले. आता त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती आहे. काल सायंकाळी सुरू झालेली छापेमारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. मात्र यामध्ये ईडीच्या काय हाती लागले याबाबत अजून काही स्पष्ट नाही. या तपासात आणखी काय माहिती बाहेर येईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत सावंत यांच्या घरी ईडीचा तपास सुरू होता. सावंत यांच्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube