Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीची लाट उसळली आहे. या नाराजीचा केंद्रबिंदू ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ठरले आहेत. नाराजी त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती. त्यानंतर आज नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातही भुजबळांनी मनातील खदखद व्यक्त केली. तर दुसरीकडे मेळाव्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपसोबत जा असं आवाहन केलं. भुजबळांनी कोणत्याही परिस्थितीत विरोधी पक्षात जाऊ नये. सत्तेतच राहावं असा कार्यकर्त्यांचा सूर आहे.
मेळाव्यात अनेक कार्यकर्ते आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणं झाली. सर्वांनीच भुजबळांना विरोधी पक्षात जाऊ नका अशी विनवणी केली. राष्ट्रवादीत मान राखला जात नसेल तर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्या. आम्ही तुमच्या पाठीशी राहू. भारतीय जनता पक्षात ओबीसींना न्याय मिळतो. त्यामुळे आपण भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्या अशी विनवणी कार्यकर्त्यांनी केली. यानंतर भुजबळांचं भाषण झालं.
मेरा वक्त भी बदलेगा और.. नाराज भुजबळांनी अखेर रान पेटवलचं, आता लढाई रस्त्यावर
उपस्थितांना संबोधित करताना भुजबळ म्हणाले की, ही लढाई मी आमदार म्हणूनच सभागृहामध्ये लढणार असून, तिथे कितीही बंधने असली तरी रास्ता तो मेरा है, असा थेट भुजबळांनी अजितदादांचे नाव न घेता दिला आहे. यावेळी नाशिक लोकसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) माझं नाव घेतलं होतं. मात्र, माझ्या विरोधात मिटिंगा झाल्या अशा खळबळजनक खुलासादेखील भुजबळांनी यावेळी केला.
मला अनेक ठिकाणाहून फोन येत आहेत. आमचा तालुका, जिल्हा, राज्यात या असं सांगत आहेत. लासलगावमध्ये आपलं कोणीतरी गेल्यासारखी अवकळा पसरली आहे. आपल्याला पेटून उठवायचं आहे, पण पेटायचं नाही. निषेध करताना आपल्याला संयम पाळायचा आहे असं आवाहन छगन भुजबळ यांना नाशिकमध्ये केलं आहे. यावेळी त्यांनी कोणताही निर्णय घाईघाईत घेणार नसून, घाईघाईने कोणतेही प्रश्न सुटत नाही. त्यामुळे तुमची साथ मला हवी आहे असे आवाहन भुजबळांनी उपस्थितांना केले. यापुढे आणखी संकटे येतील असे सांगत त्यासाठी पुन्हा एकदा ओबीसी एल्गार पुकारावा लागेल असे भुजबळ म्हणाले.
Video : छगन भुजबळांचा नवा राजकीय अजेंडा ठरला?; व्हाया भाजपा करणार नव्या इनिंगला सुरूवात
छगन भुजबळ नाराज झाल्यानंतर अजित पवार गटात धावाधाव सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे लवकरच छगन भुजबळांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. भुजबळांची समजूत काढण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती आहे.