कुंभमेळा त्र्यंबकेश्वरला पावला ! जमिनीचे भाव गगनाला भिडले; कोणते प्रकल्प येतायत ?

Nashik Kumbh Mela-आता व्यावसायिक दृष्टीकोनातून स्थानिक व बाहेरील व्यावसायिकांनी तयारी सुरू केलीय. त्यामुळे येथील जमिनींमध्ये मोठी गुंतवणूक होऊ लागली आहे.

Trimbakeswar

Trimbakeswar

Nashik Kumbh Mela : नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यासाठी (Nashik Kumbh Mela) कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. या कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक येणार आहेत. त्यामुळे अर्थकारणाला चालना मिळणार आहे. त्यासाठी आता व्यावसायिक दृष्टीकोनातून स्थानिक व बाहेरील व्यावसायिकांनी तयारी सुरू केलीय. त्यामुळे येथील जमिनींमध्ये मोठी गुंतवणूक होऊ लागली आहे. त्यामुळे या भागातील जमिनीचे भाव एकदम दुप्पटीने वाढले आहेत.


कशामध्ये गुंतवणूक होतेय ?

नाशिकपासून त्र्यंबकेश्वर तीस किलोमीटर आहे. येथे धार्मिक पर्यटनासाठी देशभरातील भाविक येतात. त्यामुळे पुजा साहित्य, हॉटेल, निवास व्यवस्था असे व्यवसाय भरभराटीला आहेत. कुंभमेळ्यामुळे व्यवसायाला अधिक चालना मिळणार आहेत. त्यामुळे वीस हजार लोकसंख्या असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आता अधिक गुंतवणूक होत आहे. जमीन, भूखंड, फार्महाऊस, घरे, हॉटेलमध्ये मोठी गुंतवणूक होत आहे. त्र्यंबकनगरी ही ब्रह्मगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहे. डोंगरामुळे विस्ताराला मर्यादा आहे. त्यामुळे आसपास जमिनी खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे जमिनी विकल्या जात आहे. प्लॉटिंग केले जात आहे. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले आहेत. या भागात पूर्वी 10 ते 12 लाख रुपये प्रति गुंठा असा भाव होता. तो आता दुपट्टीने वाढून 25 ते 30 लाख रुपये गुंठा झाला आहे.


त्र्यंबकेश्वराचा विकास आराखड्यानंतर बांधकामे

2015-16 मध्ये त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर नाशिकच्या दिशेने पेगलवाडी, तर जव्हार रस्त्यावरील गणपतबारी, मेढघर किल्ल्यापर्यंत बांधकामे झाली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये दोन्ही बाजुने डोंगर असल्याने तेथील जमिनी आरक्षित करण्यात आल्या. त्यामुळे जागेच्या दरात वाढ झाल्याचे नागरिक सांगतात. बहुमजली इमारती, रो हाऊस आसपासच्या जागा बिनशेती होऊन भूखंडांची विक्री जोमात सुरू झाली आहे. या ठिकाणी योग केंद्र, निसर्गोपचार केंद्र आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शेकडो हॉटेल, रिसॉर्ट, लॉजिंग अर्थात निवास व्यवस्थेच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत.

याबाबत त्र्यंबकेश्वरचे दुय्यम सोनानी यांचे मत जाणून घेतले. ते म्हणाले, त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील काही वर्षांत स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात वाढ झाली आहे. कुंभमेळ्यासाठी शासनाकडून त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारल्या जाताय. त्यामुळे येथे विकासकामे होत आहे. स्थानिकांनी आपल्या जागा विकण्याऐवजी त्या स्वत: विकसित करण्याचे धोरण ठेवल्याचे ठेवले आहे.


नाशिक, जळगावचे बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प

येथे गृहप्रकल्प उभारण्यासाठी नाशिक व जळगावमधील बांधकाम व्यावसायिकांनी 160 प्रस्ताव सादर केले आहे. त्यापैकी 57 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहेत. परंतु राज्यातील मोठ्या व्यावसायिकांनी एकही गृहप्रकल्पासाठी अर्ज केलेले नसल्याचे त्रंबकेश्वर नगरपालिकेचे सीईओ गोविंद जाधव यांनी माहिती दिली आहे.

Exit mobile version