Download App

‘हा इगोचा विषय’; माफीवरुन गुलाबराव आणि खडसेंमध्ये जुंपली

Eknath Khadse Vs Gulabrao Patil :  राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या 5 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा केला. यावर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणतात नाथाभाऊंनी एवढ्या खालच्या पातळीवर जायला नको होतं. ही खालची पातळी नाही वरची पातळी आहे. कायदेशीर आणि नियमाची ही पातळी आहे. आधी काहीही आरोप करायचे आणि आता आरोप सिद्ध करण्याची वेळ आली तर म्हणता खालच्या पातळीवर गेले, असे खडसे म्हणाले.

तसेच  न्यायालयात पाच कोटी रुपयाचा दावा मी दाखल केला असून, ही न्यायालयीन लढाई आहे. गुलाबराव पाटील यांच्या वकिलांच्याकडून एक प्रस्ताव होता की हे मिटवता आलं तर योग्य होईल. त्यांनी माफी मागितली तर हा विषय मिटवता येईल. बाकी न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, असे खडसे म्हणाले. यावर गुलाबराव पाटलांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

PM Modi US Visit : ‘दृष्टसहस्त्रचन्द्रो म्हणजे काय?; PM मोदींनी बायडेन यांना का दिली ही खास भेट, जाणून घ्या कारण

हा विषय जिल्ह्याचा नसून, माफी मागणे आणि न मागणं हा इगोचा विषय आहे.  ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. आम्ही त्यांच्या पाया सुद्धा पडलो आहे. मी माफी मागावी असे फार खडसेंना वाटत असेल, तर त्यांनी चहा प्यायला यावं, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.

लाईफ स्टोरी, शैक्षणिक अनुभव अन् मिळालेलं यश, दर्शनाने शेवटच्या भाषणात सांगितलं होतं…

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २७ जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत, याच कार्यक्रमाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजिंठा विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. या कार्यक्रमात ७५ हजार लोकांचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं असून या सर्वांना शासन आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ देण्यात येणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

Tags

follow us