लाईफ स्टोरी, शैक्षणिक अनुभव अन् मिळालेलं यश, दर्शनाने शेवटच्या भाषणात सांगितलं होतं…

लाईफ स्टोरी, शैक्षणिक अनुभव अन् मिळालेलं यश, दर्शनाने शेवटच्या भाषणात सांगितलं होतं…

Darshna Pawar Murder Case : एमपीएससी परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारचं शेवटचं भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. या भाषणामध्ये दर्शनाने तिच्या लाईफच्या सक्सेसचा कानमंत्र सांगत आहे. आपल्या यशस्वीततेमागे खूप लोकांची मेहनत असते, असं दर्शनाने आपल्या शेवटच्या भाषणात सांगितलं होतं. एमपीएससी परीक्षेत मिळालेल्या यशानंतर दर्शनाचा एका खाजगी क्लासमध्ये सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी तिने हे भाषण केलं होतं.

शरद पवारांना पाडण्यासाठी पार्लमेंटरी बोर्डामध्ये ठराव, प्रफुल्ल पटेलांनी सांगितला तो किस्सा

काही दिवसांपूर्वीच दर्शना पवारचा मृतदेह राजगडच्या पायथ्याशी आढळला. मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर आत्महत्या नसून हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी पोलिसांकडून जलदगतीने तपास सुरु आहे. मात्र, अशातच दर्शना पवारने केलेलं शेवटचं भाषण सध्या चांगलचं व्हायरल झालं आहे.

Dipika Kakar Baby: शोएब इब्राहिम अन् दीपिका कक्कर बनले आई-बाबा; घरी आला चिमुकला पाहुणा!

दर्शना आपल्या भाषणात म्हणते, प्रत्येकाच्या लाईफची एक स्टोरी असते, ही स्टोरी ऐकण्यासाठी लोक तेव्हाच इच्छुक असतात ज्यावेळी ती स्टोरी सक्सेस स्टोरी बनून येते. आपण शाळेमध्ये, महाविद्यालयात खूप चांगले गुण मिळवतो, पण आता जे सक्सेस मिळवलंय ते अधिक चांगलं वाटतंय. अनेकजण आपल्याला भेटायला त्यांच्या मुलींना घेऊन येतात, अभ्यास कसं करायचं विचारतात.

Ahmednagar News : बुरुडगावमधून दिंडीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान; ‘आय लव्ह नगर’ तर्फे रेनकोटचे वाटप

माझ्या बाबतीत पालक नेहमी ओव्हर कॉन्फिडंट असतात. पण मी त्यांना सांगायची की जरासं कंट्रोल करा, ही एमपीएससी आहे. पण तू नक्की पास होणार हे मला त्यांनी सांगितलं. मला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं, माझ्या यशमागे माझ्या पालकांचा आणि मित्रमैत्रिणींचा हात असल्याचं तिने सांगितलं होतं.

दरम्यान, दर्शना आपल्या एका मित्रासोबत राजगडला ट्रेकिंगला गेली होती. त्यानंतरच तिचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला. सध्या तिचा मित्र फरार झाल्याचं समोर आलं असून दर्शनाची हत्या त्यानेच केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube